ETV Bharat / state

Aid From Government To Farmers: अवकाळीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून 177 कोटींची मदत; जाणून घ्या, कोणत्या विभागात किती निधी? - सरकारकडून 177 कोटींची मदत

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात मार्च महिन्यात अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. आता मार्च महिन्यातील अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने 177 कोटींची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. हा निधी विभागनिहाय असणार आहे.

Aid From Government To Farmers
सरकारकडून शेतकऱ्यांना मदत
author img

By

Published : Apr 11, 2023, 9:43 AM IST

मुंबई : अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने 177 कोटींचा निधी जाहीर केला आहे. हा निधी विभागनिहाय आहे. याची विभागनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे, पुणे विभागाला 5 कोटी 37 लाख 70 हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. नाशिक विभागाला 63 कोटी 9 लाख 77 हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. छत्रपती संभाजी नगर विभागाला 84 कोटी 75 लाख 19 हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तर, अमरावती विभागाला 24 कोटी 57 लाख 95 हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे ही एकूण रक्कम 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपयांची आहे.

जिल्हानिहाय निधी वितरित : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा मुद्दा सभागृहात उचलून धरला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणार असल्याचे जाहीर केले होते. तसे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले होते. आता या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून तब्बल 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपयांची रुपयांची नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे. हा निधी जिल्हानिहाय वितरित करण्यात येईल.

'या' कालावधीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई : मार्च महिन्यामध्ये दिनांक 4 ते 8 आणि 16 ते 19 या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस आणि गारा पडल्या. यात संत्री उत्पादक शेतकरी, द्राक्ष उत्पादक शेतकरी, कांदा उत्पादक शेतकरी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अवकाळी पावसाला राज्य सरकारने आपत्ती घोषित केल्याने 33 टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्राचे नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांच्या जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे, त्याची पाहणी करण्यात येईल. त्यानुसार शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे, यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रशासनाला विहित नमुन्यात अर्ज द्यावा लागणार आहे.

हेही वाचा : CM Eknath Shinde on Rain : अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा; तात्काळ पंचनामे करून मदत जाहीर करण्याचे दिले आश्वासन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.