ETV Bharat / state

Fire Incidents In Mumbai : मुंबईत गेल्या सहा दिवसात 'इतक्या' आगीच्या घटना ; फटाक्यांमुळे ६४ ठिकाणी आग - फटाक्यांमुळे आग

मुंबईमध्ये दरवर्षी दिवाळीत आग लागण्याच्या घटना (Fire Incidents In Mumbai) घडतात. २२ ते २७ ऑक्टोबर या ६ दिवसात एकूण १५५ आगीच्या घटनांच्या नोंदी झाल्या (6 days 64 fires due to firecrackers) आहेत.

Fire Incidents In Mumbai
मुंबई फटाक्यांमुळे आग
author img

By

Published : Oct 28, 2022, 1:31 PM IST

मुंबई : मुंबईमध्ये दरवर्षी दिवाळीत आग लागण्याच्या घटना (Fire Incidents In Mumbai) घडतात. २२ ते २७ ऑक्टोबर या ६ दिवसात एकूण १५५ आगीच्या घटनांच्या नोंदी झाल्या (6 days 64 fires due to firecrackers) आहेत. त्यापैकी ६४ ठिकाणी आग फटाक्यांमुळे लागली आहे. फटाक्यांमुळे सर्वाधिक सोमवारी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आगीच्या घटनांच्या नोंदी झाल्या आहेत. मुंबईकरांनी आग लागू नये, याची काळजी घ्यावी. असे आवाहन मुंबई अग्नीशमन दलाकडून करण्यात आले होते. त्याकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे.

लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सर्वाधिक आगीच्या घटना - मुंबईत शनिवारपासून दिवाळी सण साजरा केला जात आहे. २२ ऑक्टोबरला १७ आगीच्या घटनांची नोंद (fire in Mumbai) झाली. त्यापैकी २ ठिकाणी आग फटाक्यामुळे लागली. २३ ऑक्टोबरला २७ आगीच्या घटना नोंद झाल्या त्यापैकी ७ ठिकाणी आग फटाक्यामुळे लागली. २४ ऑक्टोबरला ४१ आगीच्या घटना नोंद झाल्या त्यापैकी २८ ठिकाणी आग फटाक्यामुळे लागली. २५ ऑक्टोबरला ३६ आगीच्या घटना नोंद झाल्या. त्यापैकी १२ ठिकाणी आग फटाक्यामुळे लागली. २६ आणि २७ ऑक्टोबरला ३४ आगीच्या घटना नोंद झाल्या, त्यापैकी १५ ठिकाणी आग फटाक्यामुळे लागली. दीपावली दरम्यान दरवर्षी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सर्वाधिक आगीच्या घटनांची नोंद होते. यंदाही सोमवारी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सर्वाधिक आगी लागण्याच्या घटनांची नोंद झाली आहे. गेल्या सहा दिवसात आगी लागण्याच्या १५५ घटनांची नोंद झाली असली, तरी त्यात कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली (155 fire incidents in Mumbai) आहे.

मागील वर्षी १५९ आगीच्या घटनांची नोंद - गतवर्षी (२०२१) दीपावली सणाच्या दरम्यान तब्बल १५९ आगीच्या घटनांची नोंद झाली (fire in Mumbai due to firecrackers) होती. त्यापैकी ४१ ठिकाणी आग फटाक्यामुळे लागली. तर मागील वर्षी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ६५ आगीच्या घटना नोंद झाल्या त्यापैकी ५० टक्के म्हणजेच ३३ ठिकाणी आग फटाक्यामुळे लागली होती. दिवाळीत लागलेल्या आगीच्या घटनांमध्ये २०१६ मध्ये लागलेली आग सर्वात मोठी होती. लोअर परळच्या कर्मशिअल कॉम्प्लेक्समध्ये फटाक्यांमुळे लागलेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी चार मजले जळून खाक झाले होते. परंतु सर्व कार्यालयांना सुट्टी असल्याने या घटनेत कोणीही जखमी किंवा मृत्यूमुखी झालेले (fires due to firecrackers) नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.