ETV Bharat / state

Teen ager Girl Rape Case : सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीतून 14 वर्षाच्या मुलीवर वारंवार बलात्कार - 14 year old girl raped

सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचा फायदा घेऊन एका तरुणाने (14 वर्षाच्या) अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. यानंतर तिला आपल्या घरी बोलावून तिचं वारंवार लैंगिक शोषण केलं. यामुळे ती गर्भवती राहिली. या संपूर्ण घटनेविषयी तरुणाच्या आईला माहिती होती. पण तिने त्याला विरोध केला नाही. याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीच्या आधारे रविवारी संबंधित तरुण व त्याच्या आईविरुद्ध कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्याची माहिती मिळाली. (Teen agers Girl Rape Case) (14 year old girl raped) (Misuse of of social media identity) (minor girl pregnant due to rape)

Teen agers Girl Rape Case
मुलीवर वारंवार बलात्कार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 28, 2023, 3:52 PM IST

नवी मुंबई : सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून अल्पवयीन मुलीवर (14 वर्षे) वारंवार बलात्कार केल्यामुळे ती गरोदर राहिली. याप्रकरणी कामोठे येथे राहणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणाची संबंधित तरुणाच्या आईला माहिती असल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे. कामोठे पोलीस अधिक तपास करत आहेत. (Teen agers Girl Rape Case) (14 year old girl raped) (Misuse of of social media identity) (minor girl pregnant due to rape)

इंस्टाग्रामच्या माध्यमातून आले संपर्कात : नवी मुंबई परिसरातील कामोठे येथे राहणारा तरुण व तुर्भे येथे राहणारी पीडित अल्पवयीन मुलगी हे जानेवारी 2021 मध्ये सोशल मीडिया इंस्टाग्रामच्या माध्यमातून संपर्कात आले होते. या तरुणाने मुलीला गोड गोड बोलून भुरळ पाडली. त्यानंतर संबंधित तरुण व अल्पवयीन मुलगी यांच्यात प्रेमसंबंध प्रस्थापित झाले.

मुलीवर केला वारंवार बलात्कार : संबंधित पीडित मुलगी ही तुर्भे येथील रहिवासी असून तरुण हा कामोठे येथे राहणारा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलीशी संबधित तरुणाने अगोदर मैत्री केली. त्यानंतर तिला भुरळ पाडून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. मुलीच्या भोळेपणाचा फायदा घेऊन तरुणाने तिला त्याच्या कामोठे येथील घरी बोलवले व तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर मुलीवर दबाव आणून हा तरुण वारंवार तरुणीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करत होता. त्यानंतर मे 2023 मध्ये संबंधित अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली.

तरुण व त्याच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल : पीडित अल्पवयीन मुलीवर आपला मुलगा घरी बोलावून लैंगिक संबंध प्रस्थापित करत होता. तसंच तिच्यावर बलात्कार करत आहे याची कल्पना संबंधित तरुणाच्या आईला होती. तरीही तिने या गुन्ह्याला विरोध केला नाही. त्यामुळे पीडित मुलीच्या तक्रारीच्या आधारे रविवारी 27 ऑगस्टला भारतीय दंड संहिता आणि बाल लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचे संरक्षण कायद्याच्या अंतर्गत (पॉक्सो) संबंधित तरुण व त्याच्या आईविरुद्ध कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. यापूर्वीही सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत काही तरुणांनी तरुणींवर बलात्कार केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

हेही वाचा:

  1. Unnatural Sex : पतीच्या अनैसर्गिक लैंगिक संबंधाला कंटाळून पत्नीने गाठलं पोलीस स्टेशन, गुन्हा दाखल
  2. Bihar Crime : घरकाम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ५० वर्षाच्या नराधमाचा बलात्कार, मुलगी गरोदर झाली अन्...
  3. Husband Killed Wife : अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीनेच केली पत्नीची हत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.