ETV Bharat / state

आज...आत्ता....गुरुवारी रात्री 12 वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्यांवर एक नजर...

पाक पंतप्रधानांशी हस्तांदोलन? छे..! नजरेला नजरही भिडवली नाही..पवार-ठाकरे घराण्याची तिसरी पिढी एकत्र; रोहित पवारांनी घेतली अमित ठाकरेंची भेट. मुंबईच्या नायर रुग्णालयातून पाच दिवसांचे बाळ चोरीला. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या नगरसेवकावर अज्ञातांचा गोळीबार. Cricket World Cup : पावसामुळे भारत-न्यूझीलंड सामना रद्द, दोन्ही संघांना १-१ गुण

author img

By

Published : Jun 14, 2019, 12:04 AM IST

आज...आत्ता....गुरुवारी रात्री 12 वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्यांवर एक नजर...

पाक पंतप्रधानांशी हस्तांदोलन? छे..! नजरेला नजरही भिडवली नाही..

बिश्केक - पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय सहकारी संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेला किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे उपस्थित आहेत. येथे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही उपस्थित आहेत. मात्र, दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी हस्तांदोलन केले नाही की, एकमेकांना नजरेला नजरही दिली नाही. वाचा सविस्तर

पवार-ठाकरे घराण्याची तिसरी पिढी एकत्र; रोहित पवारांनी घेतली अमित ठाकरेंची भेट

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नातू अमित राज ठाकरे यांची आज मुंबईत खासगीरित्या भेट घेतली. पवार आणि ठाकरे घराण्यांच्या वारसदारांनी एकमेकांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. वाचा सविस्तर

मुंबईच्या नायर रुग्णालयातून पाच दिवसांचे बाळ चोरीला

मुंबई - नायर रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक ७ मधून गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान ५ दिवसांच्या एका नवजात बाळाची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. रुग्णालयातून बाळ चोरी करणारी महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. वाचा सविस्तर

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या नगरसेवकावर अज्ञातांचा गोळीबार

पुणे - भाजपचे नगरसेवक विशाल खंडेलवाल यांच्यावर पिंपरी-चिंचवडमध्ये अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना घडली. त्यांचे नशिब बलवत्तर म्हणून ते थोडक्यात बचावले. जीव वाचवण्यासाठी धावत असताना रस्त्यावर पडल्याने खंडेलवाल जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाचा सविस्तर

Cricket World Cup : पावसामुळे भारत-न्यूझीलंड सामना रद्द, दोन्ही संघांना १-१ गुण

नॉटिंगहॅम - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत गुरुवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला आहे. या सामन्यात पावसामुळे नाणेफेकही झाली नसून एकही चेंडू न खेळता सामना रद्द करण्याची घोषणा आयसीसीकडून करण्यात आली आहे. वाचा सविस्तर

Intro:शॉर्टसर्किटमुळे दुकानाला आग ; छपाई माशीनसह लाखोच्या साहित्याचे नुकसान
लातुर : औसा येथील व्यापारी लाईनमध्ये असलेल्या छपाई दुकानाला अचानक सोमवारी भर दुपारी आग लागल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असून मदतीची मागणी दुकान चालकाने केली आहे.
Body:शहरातील न्यायालयालागतच्या गळ्यामध्ये विनय पिंगळे यांच्या मालकीचे महालक्ष्मी डिजिटल व प्रिंटर्स चे दुकान आहे. सोमवारी दुपारी 12 च्या दरम्यान शॉर्टसर्किट झाले आणि दुकानाला आग लागली. भर दुपारच्या वेळी ही आग लागल्याने कोणी विजविण्याचेही धाडस केले नाही. काही वेळात नगरपालिकेचे अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या होत्या. मात्र, तोपर्यंत दुकानातील साहित्याची राखरांगोळी झाली होती. आग एवढी मोठी होती की लागतच असलेल्या पतसंस्थेच्या इमारतीलही हळ पोहचली होती. या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसून दुकान चालकाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. Conclusion:त्यामुळे पंचनामा करून शासनाने मदत करण्याची मागणी विनय पिंगळे यांनी केली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.