ETV Bharat / state

मुंबईत रविवारी ११६ मिलीमीटर पावसाची नोंद.. - मुंबई पाऊस बातमी

मागील काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरात पाऊस होत आहे. १ ते ५ जुलैपर्यंतच्या मुंबई शहरात १७०.४ मिलीमीटर पावसाची नोंद होत असते. मात्र, यावेळी ३९१.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

116-mm-rain-recorded-on-sunday-at-mumbai
मुंबईत रविवारी ११६ मिलीमीटर पावसाची नोंद..
author img

By

Published : Jul 6, 2020, 2:59 PM IST

मुंबई- हवामान खात्याने मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार मागील तीन दिवस मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस झाला. मात्र, आज या पावसाने विश्नांती घेतली आहे. शहरासह परिसरात काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी कोसळत आहेत. रविवारी झालेल्या तुफान पावसाने ११६.१ मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.

मुबई पाऊस अपडेट..
मागील काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरात पाऊस होत आहे. १ ते ५ जुलैपर्यंतच्या मुंबई शहरात १७०.४ मिलीमीटर पावसाची नोंद होत असते. मात्र, यावेळी ३९१.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर उपनगरात १ ते ५ जुलै दरम्यान, १७६.६ मिलीमीटर पावसाची नोंद होते. यावेळी ३८५.१ मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे. हा पाऊस ११९ टक्के एवढा आहे.

पावसामुळे पडझडीच्या घटना घडल्या आहेत. सहा ठिकाणी बांधकामाचा भाग पडला आहे. ८९ ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तर ३१ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले आहे. भांडूप संकुल येथे विहार तलावात एक मुलगा पडल्याची घटना घडली. अग्निशमन दलासह पोलीसांतर्फे त्याचा शोध सुरू आहे. नौदलच्या पाणबुड्यांनादेखील घटनास्थळी तैनात करण्यात आले होते. रविवारी रात्री ऊशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता.

हेही वाचा-भारत-चीन संघर्ष : अकाली विजय जाहीर करणे अविवेकी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.