ETV Bharat / state

'मूकनायक' शताब्दी : 'बाबासाहेबांना पत्रकार म्हणून स्वीकारले पाहिजे' - मूकनायक

एखाद्या समाजाचा विकास, करायचा असेल तर त्याला त्याच्या हक्काच्या वर्तमानपत्राची गरज असते. त्याच पार्श्वभूमीवर 'मूकनायक'ची स्थापना ही बाबासाहेबांनी केली होती. हे 'मूकनायक' म्हणजे ज्यांचा आवाज ऐकला जात नाही, अशा समाजाचा एक आवाज होता, असे ज्येष्ठ साहित्यिक ज. वी. पवार यांनी सांगितले.

J. V Pawar
ज. वी. पवार, ज्येष्ठ साहित्यिक
author img

By

Published : Feb 1, 2020, 8:41 AM IST

मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पत्रकार होते आणि वेळोवेळी या 'मूक' समाजातील व्यथा आणि त्यांचा वास्तव ते मांडत होते. परंतु, आज महाराष्ट्रातील पत्रकारांवर छाप ही एका ठराविक पत्रकारांची पडलेली आहे. बाबासाहेबांनी नियतकालिकाची चळवळ उभी केली आणि समाज एकत्र केला. त्यामुळे केव्हा तरी त्यांची दखल बाबासाहेब पत्रकार होते म्हणून करावी, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक ज. वी. पवार यांनी केले.

ज. वी. पवार, ज्येष्ठ साहित्यिक

'मूकनायक' या नियतकालिकाला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एकूणच 'मूकनायक'च्या इतिहासाची माहिती देत हे आवाहन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पत्रकार होते, त्यांनी एक चळवळ त्यातून उभी केली. परंतु, बाबासाहेबांना पत्रकार म्हणून माध्यमांकडून अजूनही महत्त्व दिले गेले नाही. ते देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा - आजपासून दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ऑनलाईन हॉलतिकीट

'मूकनायक'च्या इतिहासाबद्दल पवार म्हणाले की, त्यावेळेस साऊथ ब्युरो कमिशनच्या पुढे बाबासाहेबांना साक्ष द्यायची होती. परंतु, ते सरकारी अधिकारी होते म्हणून त्यांना ती देता आली नाही. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 16 जानेवारी 1919 रोजी त्यावेळी टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक लेख लिहून त्यासाठीची भूमिका मांडली होती. त्यानंतर कमीशन भारतात आले. त्यावेळी बाबासाहेबांनी त्यावेळच्या सरकारकडून परवानगी घेतली आणि त्यानंतर बाबासाहेबांची साक्ष झाली. त्यावेळी भांडारकर आणि विठ्ठल रामजी शिंदे हे नेते दलितांच्या बाजूने बोलणारे होते. त्यावेळी शिदे आणि बाबासाहेबांची एकाच दिवशी साक्ष आणि मुलाखती झाल्या.

त्याचा रिपोर्ट हा सगळ्या वर्तमान पत्रात आला. पण, त्यात बाबासाहेबांची साक्ष आणि रिपोर्टचा कुठेही उल्लेख वर्तमानपत्रात आला नाही. त्यामुळे बाबासाहेबांना प्रकर्षाने जाणवले की, कोणत्याही स्थितीत आपले वर्तमानपत्र असावे. माझा समाज हा मूक आहे, त्याला कोणीतरी आवाज दिला पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी 31 जानेवारी 1920 रोजी 'मूकनायक' सुरू केले आणि तिथून या चळवळीला सुरुवात झाली.

हेही वाचा - संघाच्या प्रबोधिनीकडून मुंबई विद्यापीठातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण, सातव यांचा आक्षेप

त्यावेळी हे वर्तमानपत्र चालेल की नाही, अशी स्थिती होती. परंतु, राजर्षी शाहू महाराज यांची त्यावेळी दत्तोबा लोहार यांनी भेट घडवून आणली. शाहू महाराज हे बाबासाहेब यांना मदत करण्यासाठी स्वतःहून त्यांच्या घरी आले त्यांनी बाबासाहेबांना त्यावेळी 2 हजार 500 रुपयांचा चेक दिला. एखाद्या सामान्य माणसाच्या घरी राजा येऊन भेटणे आणि त्याला मदत करणे ही घटना जगाच्या इतिहासात घडली. आणि मूकनायक हा अंक पुढे चालत राहिला. बाबासाहेब हे त्यावेळी सरकारी अधिकारी असल्याने या वर्तमान पत्रावर त्यांनी आपले नाव संपादक म्हणून टाकले नव्हते. पण, यातील मजकूर मी लिहिलेला आहे, हे ते स्पष्ट करत होते, असेही पवार म्हणाले.

Intro:
बाबासाहेबांना पत्रकार म्हणून स्वीकारले पाहिजे - ज. वी. पवार

mh-mum-01-muknayak-j-v-pavar-121-7201153

(यासाठीचे फीड मोजोव र पाठवले आहे)

मुंबई, ता. ३१:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पत्रकार होते आणि वेळोवेळी या 'मूक' समाजातील व्यथा आणि त्यांचा वास्तव ते मांडत होते. परंतु आज महाराष्ट्रातील पत्रकारांवर छाप ही एका ठराविक पत्रकारांची पडलेलीे आहे. त्यामुळे मूकनायकला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. बाबासाहेबांनी नियतकालिकाची चळवळ उभी केली आणि समाज एकत्र केला त्यामुळे केव्हा तरी त्यांची दखल बाबासाहेब पत्रकार होते म्हणून करावी, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक ज. वी. पवार यांनी केले.
मूकनायक या नियतकालिकाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एकूणच मूकनायकच्या इतिहासाची माहिती देत हे आवाहन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पत्रकार होते, त्यांनी एक चळवळ त्यातून उभी केली, परंतु बाबासाहेबाना पत्रकार म्हणून माध्यमांकडून अजूनही महत्त्व दिले गेले नाही. ते देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

'मूकनायक' च्या इतिहासाबद्दल पवार म्हणाले की, त्यावेळेस साऊथ ब्यूरो कमिशनच्या पुढे बाबासाहेबांना साक्ष द्यायची होती, परंतु ते सरकारी अधिकारी होते म्हणून त्यांना देता आले नाही, त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 16 जानेवारी 1919 रोजी त्यावेळी टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक लेख लिहून त्यासाठीची भूमिका मांडली होती.
त्यानंतर कमीशन भारतात आले. त्यावेळी बाबासाहेबांनी त्यावेळच्या सरकारकडून परवानगी घेतली आणि त्यानंतर बाबासाहेबांची साक्ष झाली. त्यावेळी भांडारकर आणि विठ्ठल रामजी शिंदे हे नेते दलितांच्या बाजूने बोलणारे होते. त्यावेळी शिदे आणि बाबासाहेबांची एकाच दिवशी साक्ष आणि मुलाखती झाल्या. त्याचा रिपोर्ट हा सगळ्या वर्तमान पत्रात आला, पण त्यात बाबासाहेबांच्या साक्ष आणि रिपोर्ट चा कुठेही उल्लेख वर्तमानपत्रात आला नाही. त्यामुळे बाबासाहेबांचा प्रकर्षाने जाणवले की, कोणत्याही स्थितीत आपले वर्तमानपत्र असावे. माझा समाज हा मूक आहे, त्याला कोणीतरी आवाज दिला पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी ३१ जानेवारी १९२० रोजी 'मूकनायक' सुरू केले आणि तिथून या चळवळीला सुरुवात झाली असल्याची माहिती ज. वी. पवार यांनी दिली.

त्यावेळी हे वर्तमानपत्र चालेल की नाही अशी स्थिती होती, परंतु राजर्षी शाहू महाराज यांची त्यावेळी दत्तोबा लोहार यांनी भेट घडवून आणली. शाहू महाराज हे बाबासाहेब यांना मदत करण्यासाठी स्वतः हून त्यांच्या घरी आले त्यांनी बाबासाहेबांना त्यावेळी दोन हजार पाचशे रुपयांचा चेक दिला. एखाद्या सामान्य माणसाच्या घरी राजा येऊन भेटणे आणि त्याला मदत करणे ही घटना जगाच्या इतिहासात घडली. आणि मूकनायक हा अंक पुढे चालत राहिला.
बाबासाहेब हे त्यावेळी सरकारी अधिकारी असल्याने या वर्तमान पत्रावर त्यांनी आपले नाव संपादक म्हणून टाकले नव्हते. पण यातील मजकूर मी लिहिलेला आहेे हे ते स्पष्ट करत होते, असेही पवार म्हणाले.
एखादा समाजाचा विकास, करायचा असेल तर त्याला त्याच्या हक्काच्या वर्तमानपत्राची करत असते त्याच पार्श्वभूमीवर 'मूकनायक' ची स्थापना ही बाबासाहेबांनी केली होती. हे 'मूकनायक' म्हणजे ज्यांचा आवाज ऐकला जात नाही, अशा समाजाचा एक आवाज होता. बाबासाहेबांना निर्माण केलेली इतर 'बहिष्कृत भारत', 'जनता', आदी नियतकालिके अनेकदा विस्कळीत झाली आणि पुन्हा ती सुरूही झाली. त्यासाठी अनेक कारणे होती. पण त्यांनी निर्माण केलेल्या 'प्रबुद्ध भारत'च्या माध्यमातून मला त्यात काम करता आले आणि त्याचा साक्षीदार बनू शकलो याचा मला अभिमान वाटतो असेही पवार म्हणाले.

Body:बाबासाहेबांना पत्रकार म्हणून स्वीकारले पाहिजे - ज. वी. पवारConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.