लातूर - शहरातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे पीडितेच्या प्रियकर आणि त्याच्या आईनेच हा प्रकार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 5 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
लातूर अल्पवयीन मुलीचे अपहरण चार दिवसांपूर्वी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलगी घर सोडून गेल्याची तक्रार करण्यात आली होती. मात्र, अधिक तपास केला असता मुलीला अंबाजोगाई येथून ताब्यात घेण्यात आले आहे. पीडीत मुलीच्या जबाबवरून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलाने आणि त्याच्या आईने सदरील मुलीचे अपहरण केल्यानंतर बार्शी तालुक्यातील पांगरी येथील कला केंद्रावर नेण्यात आले होते. मात्र, दोन दिवसातच येथील कला केंद्राच्या मालकाने या मुलीला अल्पवयीन मुलाच्या आईच्या हवाली केले. त्यानंतर अंबाजोगाई येथे तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले होते. या दरम्यान, अल्पवयीन मुलीवर दोघांनी अत्याचार केला असल्याचे मुलीने सांगितले आहे. त्यानुसार पांगरी कला केंद्रावरील दोघेजण, अंबाजोगाई येथील दोन तर मुलीच्या अल्पवयीन प्रियकरालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, अल्पवयीन मुलाची आई ही फरार आहे. पीडित मुलगी आणि तिचा प्रियकर हे दोघेही अल्पवयीन आहेत. पीडीतेच्या जबाबाबवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - उद्धव ठाकरे देशाचं नेतृत्व करणार, भाजपला टीका करण्यात 'भारतरत्न' द्या - संजय राऊत
हेही वाचा - इंग्लंड येथून ६०० प्रवासी मुंबईत, एकही पॉझिटिव्ह नाही