ETV Bharat / state

लातूरमध्ये दारुबंदीसाठी महिलांचे ग्रामपंचायतीत ठिय्या आंदोलन

निलंगा तालुक्यातील चिंचोली सयाखान येथे अवैधरित्या दारुविक्री केली जात असल्यामुळे गावातील महिलांनी दारुबंदीसाठी ग्रामपंचायतीत ठिय्या आंदोलन केले.

ग्रामपंचायतीत ठिय्या आंदोलन करणाऱ्या महिला
author img

By

Published : May 29, 2019, 3:32 PM IST

लातूर - निलंगा तालुक्यातील चिंचोली सयाखान येथे अवैधरित्या दारुविक्री केली जात आहे. त्यामुळे या गावातील महिलांनी दारूबंदीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

ठिय्या आंदोलन

चिंचोली सयाखान गावात अनेक तरुण व्यसनाच्या आहारी गेले आहेत. यामुळे अनेक कुटुंब उघड्यावर येत आहेत. अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. तरीही याकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत आहे. यामुळे गावातील महिलांनी ग्रामपंचायतीमध्ये ठाण मांडले आणि दारू विक्री बंद करावी, अशी मागणी केली.

गावातील महिलांनी तंटामुक्त समितीला याबाबत निवेदन दिले. तसेच तंटामुक्ती समितीने कार्यवाही न केल्यास आगामी काळात उग्र आंदोलन छेडू, असा इशाराही दिला.

Intro:दारूबंदी साठी महिला रस्त्यावर ;
अवैध दारूविक्रीमुळे संसार उध्वस्त
लातूर : दारूबंदी असतानाही ग्रामीण भागात आजही अवैध दारूविक्रीचे प्रमाण वाढत आहे. निलंगा तालुक्यातील चिंचोली सयाखान येथेही अशीच अवस्था असून गावातील दारूबंदी कारण्याच्या मागणीसाठी महिलांनी येथील ग्रामपंचायत कार्यलयात ठिय्या दिला. Body:संसार उपयोगी साहित्याची विक्री करून अनेक तरुण व्यसनाच्या आहारी गेले आहेत. यामुळे अनेक कुटुंब उघड्यावर येत आहेत. अनेकांचे संसार उध्वस्त होत असून याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळेच महिलावर्ग यामुळे हैराण झाले आहेत. याबाबतीत अनेकदा गावच्या तंटामुक्ती समितीकडे महिलावर्गानी तक्रार केली पण त्याची दखल घेऊन कार्यवाही करण्यात आली नसल्याने येथील दारू विक्री बंद करावी अशी मागणी महिला वर्ग करत असून ग्रामपंचायतमध्ये महिलांनी ठाण मांडले यावेळी तंटा मुक्त समितीला निवेदन देण्यात आले आहे. Conclusion:तंटामुक्ती समितीने कार्यवाही न केल्यास आगामी काळात उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा महिलांनी दिला.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.