ETV Bharat / state

...अन्यथा राजकारण सोडून घरी बसेन ; संभाजी पाटलांचा प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगीच निर्धार

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याच्या हालचाली सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने विविध राजकीय पक्षांनी उमेदवारीबाबत चाचपणी करून विधानसभा मतदार संघनिहाय मुलाखती घेणे सुरू केले आहे. उमेदवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातूर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा शुभारंभ केला.

संबोधन करताना संभाजी पाटील
author img

By

Published : Sep 11, 2019, 7:45 PM IST

लातूर- लातूरकर आणि पाणीटंचाई हे समीकरणच बनले आहे. आता हा पाण्याचा मुद्दा यंदाच्या निवडणुकांमध्येही अधोरेखित होणार हे नक्की. आज निलंगा तालुक्यातील माकणी येथे पार्टीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. आगामी दोन वर्षात लातूर शहराला उजनी धरणातून पाणीपुरवठा करणारच, अन्यथा पदाचा राजीनामा देऊन घरी बसेन, असे पालकमंत्री संभाजी पाटील यांनी सांगितले आहे.

पाटील यांनी माकणी येथील ज्वाजल येथून भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी सदरील प्रतिक्रिया दिली. आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी जाज्वल येथील हनुमान मंदीराच्या साक्षीने पक्षाच्या प्रचाराला सुरुवात केली आहे.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याच्या हालचाली सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने विविध राजकीय पक्षांनी उमेदवारीबाबत चाचपणी करून विधानसभा मतदार संघनिहाय मुलाखती घेणे सुरू केले आहेत. उमेदवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातूर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. लातूर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला असताना देखील जिल्ह्यातील मतदारांनी भारतीय जनता पार्टी व शिवसेना या युतीच्या उमेदवारांना भरभरून आशीर्वाद दिला आहे. त्यामुळे आगामी काळातही जिल्ह्यातील सहाही मतदारसंघावर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा- जळकोटमध्ये गणेश मूर्तींची स्थापना, भक्तांच्या उत्साहावर मात्र दुष्काळाचे सावट

निलंगा विधानसभा मतदार संघातील जागा ही महाराष्ट्रातील सर्वाधिक मताधिक्याने असेल, असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातुरे, युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर, समाज कल्याण सभापती संजय दोरवे, पंचायत समितीचे सभापती अजित माने, दगडू सोळुंके, कृषी सभापती बजरंग जाधव उपस्थित होते. प्रचाराच्या शुभारंभीच त्यांनी लातूरच्या पाणीप्रश्नकडे लक्ष वेधले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उजनीच्या पाण्याचे लातूरकरांना आश्वासनच मिळत आहे. त्यामुळे आता तरी हा प्रश्न मार्गी लागावा अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.

Intro:...अन्यथा राजकारण सोडून घरी बसेन ; संभाजी पाटलांचा प्रचाराचा शुभारंभ प्रसंगीच निर्धार
लातूर : लातूरकर आणि पाणीटंचाई हे समीकरणच बनले आहे. आता हा पाण्याचा मुद्दा यंदाच्या निवडणुकांमध्येही अधिरोखित होणार हे नक्की. आज निलंगा तालुक्यातील माकणी येथे पार्टीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. आगामी दोन वर्षात लातूर शहराला उजनी धरणातून पाणीपुरवठा करणारच अन्यथा पदाचा राजनामा देऊन घरी बसेन असे त्यांनी प्रचाराच्या पहिल्याच बैठकीत सांगितले आहे.
Body:आचारसंहीता जाहीर होण्यापुर्वीच पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी माकणी येथील जाज्वल हनुमान मंदीराच्या साक्षीने भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा शुभारंभ केला.
विधानसभा निवडणूकीची आचारसंहीता जाहीर होण्याच्या हालचाली सुरू झाली असून विविध राजकीय पक्ष उमेदवारीबाबत चाचपणी करून विधानसभा मतदार संघनिहाय मुलाखती घेणे सुरू केले आहेत. उमेदवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातूर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. लातूर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला असताना जिल्ह्यातील मतदारांनी भारतीय जनता पार्टी शिवसेना या युतीच्या उमेदवारांना भरभरून आशीर्वाद दिले आहेत. त्यामुळे आगामी काळातही जिल्ह्यातील सहाही मतदारसंघावर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. निलंगा विधानसभा मतदार संघातील जागा महाराष्ट्रातील सर्वाधिक मताधिक्याने असेल असे त्यांनी सांगितले यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातूरे, युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर, समाज कल्याण सभापती संजय दोरवे, पंचायत समितीचे सभापती अजित माने, दगडू सोळूंके, कृषी सभापती बजरंग जाधव उपस्थित होते. प्रचाराच्या शुभारंभीच त्यांनी लातूरच्या पाणीप्रश्नकडे लक्ष वेधले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उजनीच्या पाण्याचे लातूरकरांना आश्वासनच मिळत आहे. Conclusion:त्यामुळे आता तरी हा प्रश्न मार्गी लागावा अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.