ETV Bharat / state

पालकमंत्र्याच्या तालुक्यातच सर्वाधिक पाणीटंचाई अन् म्हणतात जलयुक्त शिवार अभियानामुळे पाणी पातळी वाढली... - निलंगा

लातूरमध्ये यावर्षीही दुष्काळाची दाहकता जाणवू लागली आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे.

पाणीटंचाई
author img

By

Published : May 19, 2019, 2:52 PM IST

लातूर - जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून पाणी पातळी वाढली असल्याचा दावा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला होता. मात्र, या आता जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत निलंगा तालुका अव्वल स्थानी आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या लातूर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे २.९९ मिटरने पाणीपातळी घटलेली आहे.

पाणीटंचाई

लातूर जिल्हा आणि दुष्काळ हे समीकरणच ठरलेले आहे. यावर्षीही याची दाहकता जाणवू लागली आहे. पाण्यासाठी नागरिकांसह जनावरांची भटकंती सुरू आहे. जिल्ह्यात ६५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार अभियानाची कामे झाले आहेत. त्यामुळे पाणी पातळीत वाढ झाल्याचा दावा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी निवडणुकीवेळी केला होता. शिवाय टँकरचीही गरज भासणार नसल्याचे ठणकावून सांगितले होते. प्रत्यक्षात त्यांच्याच तालुक्यातील जवळपास ४९ गावांमध्ये अतिशय भीषण परिस्थिती असल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाच्या माध्यमातून समोर आले आहे.

निलंगा आणि लातूर आणि जिल्ह्याच्या राजकारणाची केंद्रस्थाने आहेत. राजकीय समीकरणे य दोन ठिकाणाहून ठरत असतात . मात्र, आता जिल्ह्यात सर्वाधिक दुष्काळग्रस्त गावे असलेला तालुका म्हणून निलंगा पहिल्या क्रमांकावर आहे. तर सर्वात जास्त पाणीपातळी खोलवर गेल्यामध्ये लातूर अग्रस्थानी आहे. गतवर्षीच्या तुलनेत २.९९ मीटरने पाणीपातळी खालावलेली आहे. त्यामुळे दुष्काळजन्य स्थितीमध्ये पाण्याचे महत्व आणि जलसंधारणाची कामे किती महत्वाची असल्याचे पटवून देणाऱ्या नेत्यांच्या तालुक्यातील हे भीषण वास्तव समोर आहे.

लातूर तालुक्यातील मांजरा पट्ट्यात ऊस लागवड मोठ्या प्रमाणात होते. भर दुष्काळातही याचे प्रमाण कायम राहिल्यानेच मोठ्या प्रमाणात पाणीपातळी खालावल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर दुसरीकडे पालकमंत्र्याच्या तालुक्यातच जलसंधारणाची कामे झाली नसल्याने नागरिक नाराजी बोलून दाखवत आहे.

Intro:बाईट : डॉ. भा. ना. संगणवार, भूवैज्ञानि
पालकमंत्री यांचा बाईट mojo मोबाईवरून पाठविला आहे
लातूर - लातूर आणि निलंगा हे जिल्ह्याच्या राजकारणाची केंद्रस्थाने आहेत. राजकीय समीकरणे याचे दोन ठिाकणाहून ठरत असली तरी राजकारणाच्या व्यापात पर्यावरणाच्या संरक्षाकडे दोन्ही नेत्यांचे दुर्लक्ष राहिले आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून पाणी पातळी वाढली असल्याचा दावा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर करीत असले तरी अतिशोषित गावांच्या संख्येत निलंगा तालुका अव्वल स्थानी आहे तर दुसरीकडे कॉग्रेसचे वर्चस्व असलेल्या लातूर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे २.९९ मिटरने पाणीपातळी घटलेली आहे.
Body:लातूर जिल्हा आणि दुष्काळ हे जणू समिकरणच ठरलेले आहे. यंदाही याची दाहकता जाणवू लागली असून पाण्यासाठी नागरिकांसह जनावरांची भटकंती सुरू आहे. जिल्ह्यात ६५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार अभियनाची कामे झाले असून पाणी पातळीत वाढ झाल्याचा दावा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी निवडणुकी दरम्यान केला होता. शिवाय टँकरचीही गरज भासणार नसल्याचे ठणकावून सांगितले होते. प्रत्यक्षात त्यांच्याच तालुक्यातील जवळपास ४९ गावे अतिशोषित असल्याचे भुजल सर्वेक्षण विभागाच्या माध्यमातून समोर आले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक अतिशोषित गावे असलेला तालुका म्हणून निलंगा पहिल्या क्रमांकावर आहे. तर सर्वात जास्त पाणीपातळी खोलवर गेल्यामध्ये लातूर आग्रस्थानी आहे. गतवर्षीच्या तुलनेत २.९९ मीटरने पाणीपातळी खलावलेली आहे. त्यामुळे दुष्काळजन्य स्थितीमध्ये पाण्याचे महत्व आणि जलसंधारणाची कामे किती महत्वाची असल्याचे पटवून देणाऱ्या नेत्यांच्या तालुक्यातील हे भिषण वास्तव समोर आहे. Conclusion:लातूर तालुक्यातील मांजरा पट्यात ऊस लागवड मोठ्या प्रमाणात होते. भर दुष्काळातही याचे प्रमाण कायम राहिल्यानेच मोठ्या प्रमाणात पाणीपातळी खालावल्याचा अंदाज वर्तिवला जात आहे. तर पालकमंत्र्याच्या तालुक्यातच जलसंधारणाची कामे झाली नसल्याने अतिशोषित गावांच्या संख्येच्या दृष्टीने या तालुक्याचा पहिला क्रमांक लागल्याचे समोर येत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.