लातूर- दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या लातूरकरांना परतीच्या पावसाने दिलासा दिला आहे. गेल्या 4 दिवसांत मांजरा धरणाच्या पाणीपातळीत 4 दलघमीने वाढ झाली असून जिल्ह्यातील लहान- मोठे तलावही तुडुंब भरले आहेत. त्यामुळे लातूरकाना मोठा दिलासा मिळाला आहे.
भर पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांसह जिल्हा प्रशासनात चिंतेचे वातावरण होते. पुन्हा लातूरला रेल्वेने पाणी पुरवावे लागणार अशी स्थिती निर्माण होत असताना परतीच्या पावसाने मोठा दिलासा दिला आहे. जिल्ह्यात गेल्या 8 दिवसांपासून रिमझिम तर रविवारपासून मुसळधार पाऊस होत असल्याने पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. 24 तासांमध्ये शहराला पाणीपुरवठा मांजरा धरणात तर 3 दलघमीने पाणीसाठा वाढला आहे.
हेही वाचा- लातूर : तेरू नदीला पूर; २०० मतदार मतदानापासून वंचित
लातूर, जळकोट, निलंगा, औसा यासह सर्व जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला असून यामध्ये असेच सातत्य राहण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहे. उशिरा का होईना पावसाने दमदार हजेरी लावल्याने रब्बी हंगामाला याचा फायदा होणार आहे. पावसाळ्यात प्रथमच मुसळधार पाऊस झाला असून सर्वत्र पाणीच-पाणी अशी स्थिती झाली आहे.
हेही वाचा- लातुरात अद्याप 60 टक्केच पाऊस; परतीच्या पावसावर शेतकऱ्यांची आशा