ETV Bharat / state

पुरोगामी महाराष्ट्रातील भयाण अवस्था; शाळा बंदसाठी गावात दवंडी

एकीकडे डिजिटल शाळेचे वारे वाहत असले तरी जिल्ह्यात आजही काही शाळांचे वर्ग हे पत्र्याच्या शेडमध्येच भरतात. असाच काहीसा प्रकार  मंगळवारी जळकोट तालुक्यातील चेरा गावात घडला आहे.

ग्रामस्थांनी मंगळवारी शाळेला टाळे ठोकले
author img

By

Published : Sep 24, 2019, 11:47 PM IST

Updated : Sep 24, 2019, 11:55 PM IST

लातूर - एकीकडे डिजिटल शाळेचे वारे वाहत असले तरी जिल्ह्यात आजही काही शाळांचे वर्ग हे पत्र्याच्या शेडमध्येच भरतात. असाच काहीसा प्रकार मंगळवारी जळकोट तालुक्यातील चेरा गावात घडला आहे. भर पावसात विद्यार्थ्यांचे हाल होत असून याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष असल्याने संतप्त ग्रामस्थांनी मंगळवारी शाळेला टाळेच ठोकले. शिवाय सुसज्ज इमारत होत नाही तोपर्यंत शाळा बंद ठेवणार असल्याची दवंडी गावात देण्यात आली आली.

ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया

चेरा गावचे मराठवाडा विद्यालय गेल्या १९ वर्षापासून पत्राच्या शेडमध्येच सुरू आहे. त्यामुळे विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना असुविधांचा सामना करावा लागतो. सध्याच्या पावसाळ्यामुळे तर विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल सुरू असून ज्ञानाचे धडे घेणेही अशक्य होत आहे. मराठवाडा विद्यालयास २००२ सालीच शासनाचे १०० टक्के अनुदान देण्यात आले आहे. तेव्हापासून चेरा गावच्या ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज इमारत बांधावी म्हणून वारंवार संस्थेकडे मागणी केली होती. मात्र, संस्थेने ग्रामस्थांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळेच सोमवारी ग्रामस्थांनी मराठवाडा विद्यालयास टाळे ठोकले. शिवाय आजही शाळा बंदच होती.

chera
इमारत होत नाही तोपर्यंत शाळा बंद ठेवणार असल्याचा ईशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

हेही वाचा- देशमुख Vs निलंगेकर...लातुरचा राजा कोण?

ग्रामस्थांचा संताप एवढा आहे की, शाळेत विद्यार्थ्यांनी येऊ नये म्हणून चक्क गावात दवंडी दिली होती. जोपर्यंत सुसज्य इमारत बांधकामला संस्था सुरुवात करणार नाही, तोपर्यंत विद्यालयास कुलूप लावून आंदोलन केले जाईल, असे ग्रामस्थ सांगत आहेत. विद्यालयात कोणतीच भौतिक सुविधा उपलब्ध नाही. संस्थेचे संस्थाचालक भरत देशमुख, मुख्याध्यापक सचिन देशमुख यांना सरपंच, उपसरपंच विजय माने, पोलीस पाटील गावकऱ्यांनी वेळोवेळी बोलून इमारतीच्या बांधकामाची मागणी केली असता त्यांनी याकडे सतत दुर्लक्ष केले होते. गटशिक्षण अधिकारी गावडे यांना माहिती विचारली असता आम्ही संस्थेला याबाबत खुलासा सादर करण्याकरिता लेखी पत्र दिले असल्याचे सांगितले.

हेही वाचा- लातूरकरांना दिलासा; निवडणुकीमुळे 1 महिना टळले पाणीसंकट

Intro:ग्रामस्थ 01
ग्रामस्थ 02

पुरोगामी महाराष्ट्रातील भयाण अवस्था : गावात दवंडी पण शाळा बंदसाठी...
लातूर : एकीकडे डिजिटल शाळेचे वारे वाहत असले तरी आजही काही शाळांचे वर्ग हे पत्र्याच्या शेडमध्येच भरतात..त्यामुळे मंगळवारी गावात दवंडी घेण्यात आली ती शाळेत या म्हणून नव्हे तर सुसज्ज इमारतीसाठी शाळा बंद ठेवण्यात येणार असल्याची...असाच काहीसा प्रकार जळकोट तालुक्यातील चेरा गावात घडला आहे. भर पावसात विद्यार्थ्यांचे हाल होत असून याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष असल्याने संतप्त ग्रामस्थांनी आज शाळेला टाळेच ठोकले. शिवाय सुसज्ज इमारत होत नाही तोपर्यंत शाळा बंद ठेवणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.Body:चेरा गावचे मराठवाडा विद्यालय गेल्या १९ वर्षापासून पत्राच्या शेडमध्येच सुरू आहे. त्यामुळे विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना असुविधाचा सामना करावा लागतो. सध्याच्या पावसाळ्यामुळे तर विद्यर्थ्यांचे प्रचंड हाल सुरु असून ज्ञानाचे धडे घेणेही अश्यक्य होत आहे. मराठवाडा विद्यलयास २००२ सालीच शासनाचे १०० टक्के अनुदान देण्यात आले आहे. तेव्हापासून चेरा गावच्या ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज इमारत बांधावी म्हणून वारंवार संस्थेकडे मागणी केली होती. मात्र, संस्थेने ग्रामस्थांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळेच सोमवारी ग्रामस्थांनी मराठवाडा विद्यालयास टाळे ठोकले. शिवाय आजही शाळा बंदच होती. ग्रामस्थांचा संताप एवढा आहे आज शाळेत विदयार्थ्यांनी येऊ नये म्हणून चक्क गावात दवंडी दिली होती. जोपर्यंत सुसज इमारत बांधकामला संस्था सुरवात करणार नाही, तोपर्यंत विद्यालयास कुलूप लावून आंदोलन केले जाईल, असे ग्रामस्थ सांगत आहेत. विद्यालयात कोणतीच भौतिक सुविधा उपलब्ध नाही. संस्थेचे संस्थाचालक भरत देशमुख, मुख्याध्यापक सचिन देशमुख यांना सरपंच, उपसरपंच विजय माने, पोलीस पाटील गावकऱ्यांनी वेळोवेळी बोलून इमारतीच्या बांधकामाची मागणी केली असता त्यांनी याकडे सतत दुर्लक्ष केले होते. Conclusion:गटशिक्षण अधिकारी गावडे यांना माहिती विचारले असता आम्ही संस्थेला याबाबत खुलासा सादर करण्याकरिता लेखी पत्र देऊन दिले असल्याचे सांगितले.
Last Updated : Sep 24, 2019, 11:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.