ETV Bharat / state

लातूरमध्ये कार पलटी होऊन २ महिलांचा मृत्यू, चालक गंभीर

शिरुरताजबंद ते हाडोळती मार्गावरील हिप्पळगाव (ता. अहमदपूर) पाटी येथे कार पलटी होऊन अपघात झाला. या अपघातामध्ये २ महिलांचा मृत्यू झाला आहे. तर चालक गंभीर जखमी झाला आहे.

author img

By

Published : Apr 16, 2019, 11:05 PM IST

लातूरमध्ये कार पलटी होऊन २ महिलांचा मृत्यू, चालक गंभीर

लातूर - शिरुरताजबंद ते हाडोळती मार्गावरील हिप्पळगाव (ता. अहमदपूर) पाटी येथे कार पलटी होऊन अपघात झाला. या अपघातामध्ये २ महिलांचा मृत्यू झाला आहे. तर चालक गंभीर जखमी झाला आहे. समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरला हुलकावणी देताना कार पलटी होऊन हा अपघात झाला. मंगळवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

अपघातात कलावती गणपत शिंदे (वय ४५, मंडलापूर, मुखेड तालुका), संध्या जाधव (वय ४२, रा. भुतन हिप्परगा, ता. देगलूर) या दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर चालक जावेद शेख (वय २५ रा. बार्शी) हा गंभीर जखमी झाला आहे. हे तिघेजण बार्शीहून विवाह सोहळ्यासाठी काटेवाडी (ता. देगलूर) येथे जात होते. हिप्पळगाव येथील वळणावर अचानक समोर ट्रॅक्टर आल्याने कारचालकाचा ताबा सुटला आणि कार (एम.एच. १३ सी.एस.४००४) पलटी झाली.

कारमधील कलावती शिंदे ही महिला जाग्यावरच ठार झाली तर संध्या जाधव यांचा उपचारासाठी लातूर येथे घेऊन जाताना मृत्यू झाला. तर चालक जावेद शेखला लातूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

Intro: ट्रॅक्टरला हुलकावणी देताना कारची पलटी ; दोन महिलांचा मृत्यू
लातूर : शिरुरताजबंद ते हाडोळती मार्गावरील हिप्पळगाव (ता. अहमदपूर) पाटी येथे समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरला हुलकावणी देताना कार पलटी होऊन दोन महिलांचा मृत्यू झाल्या तर चालक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली.
Body:मुखेड तालुक्यातील मंडलापूर येथील रहिवाशी कलावती गणपत शिंदे (वय ४५) संध्या जाधव (वय ४२) रा. भुतन हिप्परगा, ता. देगलूर तसेच चालक जावेद शेख (वय २५) रा. बार्शी हे बार्शीहून विवाह सोहळ्यासाठी काटेवाडी ता. देगलूर येथे जात होते. हिप्पळगाव येथील वळणावर अचानक ट्रॅक्टर समोर आल्याने कारचालकाचा ताबा सुटला आणि कारची (एम.एच. १३ सी.एस.४००४) पलटी झाली. कारमधील कलावती शिंदे ही महिला जाग्यावरच ठार झाल्या तर संध्या जाधव यांचा उपचारासाठी लातूर येथे घेऊन जाताना मृत्यू झाला. तर चालक जावेद शेख यांना गंभीर जखमी मुळे लातूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Conclusion:अहमदपूर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.