लातूर : सरकारने 'वन नेशन, वन टॅक्स' असे सांगितले, मात्र प्रत्यक्षात राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा टॅक्स हा भरवाच लागत आहे. त्यामुळे लहान-मोठे व्यापारी, उद्योजक अडचणीत आले आहेत. यावर तत्काळ तोडगा काढावा या मागणीसाठी लातुरात व्यापाऱ्यांनी आंदोलन केले.
कायद्यातील त्रुटी दूर करण्याची मागणी
जीएसटी कायद्यात अनेक त्रुटी असून याचा फटका व्यापाऱ्यांना बसत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी या त्रुटी दूर करण्याची मागणी केली आहे. हे काम करताना सीए आणि कर सल्लागार यांची प्रचंड धावपळ होत आहे. कायद्यातील आठ त्रुटी आहेत त्यात काही प्रमाणात का होईना सुधारणा करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
देशभरात आंदोलन
देशभरातील अडीच लाखांपेक्षा जास्त सीए, पंधरा लाख कर सल्लागार आणि लाखो व्यापाऱ्यांनी शुक्रवारी संयुक्त आंदोलन केले. ज्या जिल्ह्यात वस्तू व सेवाकर भवन आहे. ज्यामध्ये केंद्रीय आणि राज्यस्तरीय अशी दोन कार्यलय आहेत, अशा कार्यालयांसमोर हे आंदोलन करण्यात आले. लातुरमधील व्यापाऱ्यांनीही आंदोलन करत आपला सहभाग नोंदविला. लातूर शहरातील सीए, कर सल्लागार आणि व्यापाऱ्यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला. योग्य वेळेत मागण्या मान्य नाही झाल्यास आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.
हेही वाचा - 'अण्णा हजारे भूमिकेशी ठाम, सहसा मागे हटत नाहीत हा आजवरचा अनुभव'