ETV Bharat / state

लातुरात मागणीपेक्षा निम्माच ऑक्सिजनचा पुरवठा, रुग्णांना पाठवले जातेय दुसऱ्या जिल्ह्यात - लातूर कोरोना रुग्ण बातमी

लातुर जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांबरोबर ऑक्सिजनची मागणीही मोठ्याप्रमाणात वाढत आहे. मात्र, ऑक्सिजनचा पुरवठा हा मागणीपेक्षा निम्मा असल्याने कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये चिंतेचे वातावरण पहायला मिळत आहे.

oxygen cylinder
ऑक्सिजन सिलेंडर
author img

By

Published : Sep 13, 2020, 8:09 PM IST

Updated : Sep 13, 2020, 10:30 PM IST

लातूर - कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच कमी होत असलेला ऑक्सिजनचा पुरवठा ही जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत भर टाकणारी बाब आहे. दिवसाकाठी दोनशे ते अडीचशे कोरोना रुग्ण वाढत आहे. जिल्ह्यात दोन हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे दिवसाकाठी 1 हजार 600 ऑक्सिजन सिलेंडरची आवश्यकता असताना केवळ 600 सिलेंडरचा पुरवठा होत आहे. परिणामी रुग्णांच्या नातेवाईकांची ऑक्सिजनच्या शोधात दमछाक होत आहे. तर खासगी रुग्णालये आता उपचारापेक्षा रुग्ण दुसरीकडे पाठविण्यावर भर देत आहेत.

लातुरात मागणीपेक्षा निम्माच ऑक्सिजनचा पुरवठा

कोरोनाग्रस्तावर उपचारासाठी ऑक्सिजन महत्वाचा आहे. त्या अनुशंगाने जिल्ह्यात दोन एजन्सीजकडून ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा केला जात आहे. यासाठी आवश्यक असलेले लिक्वीड हे पुणे आणि नागपूरहून आणले जाते. मात्र, असे असतानाही केवळ 800 सिलिंडर एवढाच ऑक्सिजन निर्माण होत आहे. यापैकी 20 टक्के ऑक्सिजन इतरत्र वापरला जात आहे तर 80 टक्के हा आरोग्य सेवेसाठी त्याचा वापर होत आहे. कोरोनाग्रस्तांना ऑक्सिजनची गरज निर्माण झाल्यापासून ऑक्सिजन लिक्वीडच्या मागणीत दुप्पटीने वाढ करण्यात आल्याचे विजया एजन्सीचे वैभव गिल्डा यांनी सांगितले आहे. सध्या जिल्ह्यात दोन हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. वैद्यकीय महाविद्यालयासह लातूर शहरातील 14 खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. मात्र, ऑक्सिजन सिलेंडरचा वेळेत पुरवठा होत नसल्याने उपचारापूर्वीच रुग्णाची स्थिती पाहून त्यांना सोलापूर किंवा पुण्याकडे पाठविले जात आहे.

अशी स्थिती असतानाच एजन्सीकडून डॉक्टरांना एक पत्र देण्यात आले की, ऑक्सिजन पुरवठा होऊ शकला नाही तर ओढावलेल्या परस्थितीला एजन्सी जबाबदार राहणार नाही. त्यामुळे आता रुग्ण दाखल करुन घेण्यापूर्वी डॉक्टर विचार करू लागले आहेत. हवेद्वारे ऑक्सिजन निर्मिती करणारा लातुरात एक प्रकल्प आहे. याद्वारे 24 तासात 400 सिलेंडर ऑक्सिजन निर्मित होते. वाढती मागणी पाहता विजय गॅसमध्ये लिक्वीडद्वारे 450 ऑक्सिजन सिलेंडर तयार केले जात आहेत. रुग्णांची वाढती संख्या आणि ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे जिल्हा प्रशासन आता कामाला लागले आहे.

एका रुग्णास 10 तासामध्ये एक ऑक्सिजन टाकी लागते. त्यामुळेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. तसेच ज्या ठिाकणी उपचार सुरू आहेत तिथे ऑक्सिजन पुरवठा करू शकतील, असे खाटाही तयार केल्या जात आहेत. यामध्ये उदगीमध्ये 170, औसा 30, किल्लारी 30, देवणीमध्ये 30 खाटा तयार करण्यात आले आहेत. वाढती रुग्णसंख्या पाहता हाच फार्म्युला सर्वत्र राबवला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी सांगितले आहे. मात्र, दिवसागणिक वाढत असलेली रुग्णांसख्या पाहता हे पाऊल उचलण्यात आले आहे. पुर्वतयारी करण्यात आली असती तर ही वेळ आली नसती हेच खरे.

हेही वाचा - लातूर : खराब रस्त्यामुळे वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णाचा रिक्षातच मृत्यू

Last Updated : Sep 13, 2020, 10:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.