ETV Bharat / state

मॉर्निंग वॉकला गेलेल्या शिक्षक दाम्पत्याला अज्ञात वाहनाने उडविले; दोघांचाही मृत्यू

श्रावण रामराव सोमवंशी व प्रतिभा सोमवंशी, अशी मृत शिक्षक पती-पत्नीची नावे आहेत.

मृत शिक्षक दाम्पत्य
author img

By

Published : May 8, 2019, 2:08 PM IST

Updated : May 8, 2019, 3:15 PM IST

लातूर - शिरूरताजबंद-हाडोळती मार्गावर सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या शिक्षक दाम्पत्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला आहे. हा अपघात आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास झाला. श्रावण रामराव सोमवंशी व प्रतिभा सोमवंशी अशी मृत शिक्षक पती-पत्नीची नावे आहेत.

श्रावण रामराव सोमवंशी हे पत्नीसमेवत नेहमीप्रमाणे सकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडले होते. शिरुरताजबंदपासून दीड किमी अंतरावर गेले असताना त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये प्रतिभा यांचा जागीच मृत्यू झाला. तर अपघातात श्रावण सोमवंशी गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी अहमदपूर येथील सरकारी रुग्णालयात हलिवण्यात आले होते. मात्र, गंभीर जखमी असल्याने त्यांना लातूर येथील जिल्हा रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच त्यांचाही मृत्यू झाला. शिरुरताजबंद येथील सरकारी रुग्णालयात मृतांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

श्रावण सोमवंशी हे मुळचे वाढवणा ता. अहमदपूर येथील आहेत. दोघेही वळसंगी येथील जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक होते. गेल्या काही वर्षांपासून ते शिरुरताजबंद येथे राहत होते. शिक्षक दाम्पत्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वळसंगी येथे आज दुपारी ३ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Intro:मॉर्निंग वॉकला गेलेल्या शिक्षक दांम्पत्यास अज्ञात वाहनाने उडविले ; दोघांचाही मृत्यू
लातूर - शिरुरताजबंद - हाडोळती मार्गावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या शिक्षक दांम्पत्यास अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना बुधवारी सकाळी ६ च्या दरम्यान घडली. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला असून शिरुरताजबंद येथील सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू आहे.
Body:श्रावण रामराव सोमवंशी व त्यांची पत्नी प्रतिभाताई सोमवंशी (प्रतिभाताई शिवाजी आटखिळे) हे दोघे नेहमीप्रमाणे सकाळी फीरण्यास घराबाहेर पडले होते. शिरुरताजबंद पासून दीड किमी अंतरावर गेले असता त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये प्रतिभाताई यांचा जागीच मृत्यू झाला होता तर श्रावण सोमवंशी हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी अहमदपूर येथील सरकारी रुग्णालयात हलिवण्यात आले होते. मात्र, गंभीर जखमी असल्याने त्यांना लातूर येथील जिल्हा रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच त्यांचाही मृत्यू झाला. श्रावण सोमवंशी हे मुळचे वाढवणा ता. अहमदपूर येथील असून दोघेही वळसंगी येथील जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक होते. गेल्या काही वर्षांपासून ते शिरुरताजबंद येथे राहत होते. मात्र, या दुर्देवी घटनेत दोघांचाही मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. Conclusion:वळसंगी येथे दुपारी 3 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Last Updated : May 8, 2019, 3:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.