ETV Bharat / state

ग्रामीण भागातील शाळांचे वास्तव: आदेशानुसार शिक्षकांची हजेरी; कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांची दांडी - corona impact on Latur rural education

23 नोव्हेंबरपासून माध्यमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. शहरात विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती आहे. मात्र, ग्रामीण भागात आजही शाळा ह्या ओस पडलेल्या आहेत. शिक्षक हजर आणि विद्यार्थी गैरहजर अशी स्थिती ओढवलेली आहे. शिक्षकांनी नाहरकत प्रमाणात घेण्यासाठी प्रयत्न केले मात्र, पालकांमध्ये कोरोनाला घेऊन आजही भीतीचे वातावरण आहे.

रिकामी शाळा
रिकामी शाळा
author img

By

Published : Dec 7, 2020, 3:11 PM IST

Updated : Dec 7, 2020, 3:43 PM IST

लातूर - शैक्षणिक जगतामध्ये 'लातूर पॅटर्न' प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यात तब्बल 8 महिन्यानंतर शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, शहरातील काही मोजक्याच शाळा सोडल्या तर परिस्थिती 'जैसे थे' च आहे. पालकांमध्ये कोरोनाबाबत भीती कायम आहे. त्यामुळेच नाहरकत प्रमाणपत्र शाळेकडे देण्यास उदासीनता दिसत आहे. शाळांमध्ये शिक्षक व कर्मचारी हे हजेरी लावत आहेत. पण विद्यार्थीच फिरकत नसल्याने शिक्षणाचे धडे द्यायचे कुणाला हा प्रश्न कायम आहे.

जिल्ह्यात एकूण 647 शाळांपैकी 542 शाळा सुरू करण्याची परवानगी शिक्षण विभागाने दिली. पहिल्या टप्प्यात इयत्ता नववी तर त्यानंतर इयत्ता दहावीचे वर्ग सुरू करण्याचे राज्य सरकारने आदेश देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात पटसंख्येच्या तुलनेत 10 ते 15 टक्केच विद्यार्थी हे शाळेत उपस्थित राहत आहेत. त्यामुळे शाळा सुरू करूनही उद्देश साध्य होणार की नाही याबाबत साशंकता कायम आहे.

ग्रामीण भागातील शाळांचे वास्तव

ऑनलाईन शिक्षणपद्धत बहुतांश अपयशी-

शैक्षणिकदृष्ट्या लातूरला मराठवाड्यात वेगळे असे महत्व आहे. लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन शिक्षणपद्धती राबविण्यात आली खरी परंतु, याचा लाभ केवळ शहरी भागातील विद्यार्थ्यांनीच घेतला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे मोबाईल, नेटवर्क याची उपलब्धता नसल्याने हा प्रयोग यशस्वी झाला नव्हता. अखेर कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्याचे लक्षात येताच 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याच्या राज्य सरकारकडून सूचना देण्यात आल्या आहेत.

ना हरकत देण्यास पालकांमध्ये उदासीनता-

राज्य सरकारच्या आदेशानुसार शिक्षकांच्या कोरोना चाचणीही करण्यात आल्या आहेत. एवढे सर्व होऊनही विद्यार्थी आणि पालकांची मानसिकता ही बदललेली नाही. विद्यार्थी शाळेत येण्यापूर्वी त्यांनी पालकांचे नाहरकत प्रमाणपत्र घेऊन येणे गरजेचे होते. परंतु, अनेकांनी ही सहमतीच दर्शविली नाही. लातूर शहरापासून जवळच असलेल्या पाखरसंगावी येथील रविंद्रनाथ टागोर माध्यमिक विद्यालयात शिक्षकांची हजेरी दिसून आी. मात्र, विद्यार्थी गैरहजर राहिले होते. शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत होते. परंतु, दुपारचे 12 वाजले तरी पाचच विद्यार्थ्यांची शाळेत उपस्थिती होती. डिसेंबर महिन्यात शैक्षणीक वर्ष अंतिम टप्प्यात असताना पालक हे कोरोनाचा धोका पत्करण्याच्या मनस्थितीत नाहीत. तसेच कोरोनावर लस बाजारात आल्यावरच विद्यार्थ्यांना शाळेत पाठविले जाईल, अशी पालकांची मानसिकता आहे.

हेही वाचा-जिल्ह्यात आजअखेर ९८ टक्के शाळा सुरू, विद्यार्थ्यांनी मांडल्या ऑनलाईन शिक्षणातील अडचणी

शहरांपेक्षा ग्रामीण भागात चित्र वेगळे
शिक्षकांनी 8 महिन्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी शाळा सुरू झाल्याने गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. त्यानंतर शहरातील शाळेचे इयत्ता नववी आणि दहावीचे वर्गही सुरू झाले आहेत. पण, ग्रामीण भागात कोरोनाचा धोका कमी असतानाही पालकांची मानसिकताही बदललेली नाही. काही मोजक्याच पालकांनी सहमती पत्र शाळेकडे सुपूर्द केले आहेत. त्यामुळे अभ्यासक्रम कसा पूर्ण होईल आणि यंदाच्या शैक्षणिक वर्षाचे काय भविष्य असेल हे सांगता येणार नाही.

हेही वाचा-परभणीच्या शिक्षण विभागात बनावट क्रिडा प्रमाणपत्र घोटाळा; कार्यालय अधीक्षकाला अटक

शिक्षकांची हजेरी विद्यार्थी मात्र गैरहजर
23 नोव्हेंबरपासून शिक्षक हे नियमित शाळेमध्ये हजेरी लावत आहेत. एवढेच नाही घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याच्या सूचना करीत आहेत. पण पालक हे कोरोनाबद्दल साशंका उपस्थित करीत आहेत. शाळेत सैनिटाईजर, मास्क अशी सर्व खबरदारी घेतली जात असतानाही पालकांची पाल्यांना शाळेत पाठविण्याची मानसिकताच नाही. त्यामुळे सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत शाळेत शिक्षक व इतर कर्मचारी उपस्थित असतात. पण विद्यार्थी हजर नाहीत, असेच चित्र आहे.

मुख्याध्यापक, पालकांची बैठक घेऊन समस्या जाणून घेणार- औदुंबर उकिरडे
शहरी भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पण, ग्रामीण भागात समस्या ही कायम आहे. पालकांना याबाबत सूचनाही केल्या आहेत. पण मानसिकता ही बदलत नाही. त्यामुळेच मंगळवारी मुख्यध्यापक आणि पालकांच्या बैठका घेतल्या जाणार आहेत. नेमक्या अडचणी काय आहेत आणि त्यावर मात कशी करता येईल याविषयी चर्चा होणार असल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाचे सचिव औदुंबर उकिरडे यांनी सांगितले आहे.

Last Updated : Dec 7, 2020, 3:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.