ETV Bharat / state

'...म्हणून भारताने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन देण्याची तयारी दर्शिवली असेल' - मलेरिया

अमेरिकेकडून भारताकडे हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनची मागणी करण्यात आली असून यावरून वादंग निर्माण झाले आहे. भारतामध्ये हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनची उपलब्धता मोठ्या प्रमाणात असून सद्यस्थितीला अमेरिकेच्या तुनलनेत भारतात कोरोना रुग्णांची संख्या नगण्य आहे. यामुळेच अमेरिकेला हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन देण्याबाबत सकारात्मकता दर्शिवली असल्याचे मत प्राध्यापक डॉ. आर.टी.भराटे यांनी व्यक्त केले आहे.

Hydroxychloroquine
हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन
author img

By

Published : Apr 8, 2020, 11:04 AM IST

लातूर - भारतामध्ये हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनची उपलब्धता मोठ्या प्रमाणात असून सद्यस्थितीला अमेरिकेच्या तुनलनेत भारतात कोरोना रुग्णांची संख्या नगण्य आहे. यामुळेच अमेरिकेला हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन देण्याबाबत सकारात्मकता दर्शिवली असल्याचे मत वरीष्ठ श्वसन विकार तज्ञ आणि विलासराव देशमुख वैद्यकीय विज्ञान संस्थेचे प्राध्यापक डॉ. आर.टी.भराटे यांनी व्यक्त केले आहे.

भारताने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन देण्याची तयारी दर्शिवली असेल

हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन हे विषाणूजन्य आजारावर वापरण्यात येणारे औषध आहे. हे औषध मानवी प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते. जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. सध्या कोरोनाबाधितांची रोगप्रतिकार शक्ती वाढवणे हाच पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळेच अमेरिकेकडून हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनची मागणी करण्यात आली असून यावरून वादंग निर्माण झाले आहे.

भारत देशात मलेरियाचे रुग्ण अधिक सापडतात. परिणामी हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषध मोठ्या प्रमाणात वापरले जाते. आता हे औषध कोविड-१९ च्या उपचारासाठी फायदेशीर असल्याचे आढळून आले आहे. याच्या वापरामुळे मृत्यूदर कमी होत असल्याचे निदर्शनास येत असल्याने या हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनची मागणी होत आहे. हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषध बनवण्यासाठी आवश्यक असलेला कच्चा मालही भारतामध्ये अधिक आहे. त्यामुळे आपल्याकडे या ड्रगची निर्मिती स्वस्तामध्ये होते. शिवाय सध्या भारतामध्ये रुग्णांची संख्या ही अमेरिकेच्या तुलनेत कमी असल्यानेच याची मागणी होत असल्याचे डॉ. भराटे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, कोरोनामुळे अमेरिकेमध्ये १० हजारापेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळेच उपचारासाठी आवश्यक असलेल्या हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनची मागणी भारताकडे करण्यात आली आहे. हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन देण्याची तयारी दर्शिवली हे ठिक आहे. मात्र, मागणी फेटाळली असती, तर त्याचे परिणाम भोगावे लागले असते, असे म्हणत राष्ट्रध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी नव्या वादाला सुरवात केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.