लातूर - केंद्र सरकारने घेतलेले निर्णय हे सर्वसामान्यांसाठी जाचक ठरत आहेत. कृषी विधेयकाला मंजुरी आणि कायमस्वरूपी कामागरांबद्दल घेतलेल्या निर्णयामुळे अनेकांचे भवितव्य अंधकारमय होणार आहे. एकिकडे कोरोनामुळे जगणे मुश्किल होत असतानाच जनतेला आधार न देता कठोर निर्णय घेतले जात असल्याने सोमवारी तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून गोट्या-खेळो आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकार विरोधी घोषणाही देण्यात आल्या.
केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात लातुरात गोट्या-खेळो आंदोलन; तहसील कार्यालयासमोर रंगला डाव - लातूर राष्ट्रवादी युवक काँग्रेस केंद्र सरकार विरोध बातमी
नोटबंदी, बाजारसमित्यांचे खासगीकरण, कृषी विधेयकाला मंजुरी यामुळे जनतेचे नुकसानच झाले आहे. त्यामुळे लातुरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला. तहसील कार्यालयासमोर गोट्याचा डाव मांडण्यात आला होता. सरकारच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यासाठी केलेले हे गोट्या-खेळो आंदोलन चर्चेचा विषय बनला होता.
केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात लातुरात गोट्या-खेळो आंदोलन
लातूर - केंद्र सरकारने घेतलेले निर्णय हे सर्वसामान्यांसाठी जाचक ठरत आहेत. कृषी विधेयकाला मंजुरी आणि कायमस्वरूपी कामागरांबद्दल घेतलेल्या निर्णयामुळे अनेकांचे भवितव्य अंधकारमय होणार आहे. एकिकडे कोरोनामुळे जगणे मुश्किल होत असतानाच जनतेला आधार न देता कठोर निर्णय घेतले जात असल्याने सोमवारी तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून गोट्या-खेळो आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकार विरोधी घोषणाही देण्यात आल्या.
Last Updated : Sep 28, 2020, 3:23 PM IST