ETV Bharat / state

'त्या' तरूणीचा बलात्कार करून जिवंत जाळणाऱ्यांना त्वरित फाशी द्या' - हैदराबाद बलात्कार

संपूर्ण देशातील बलात्कारांतील आरोपींचे खटले फास्ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना मुस्लिम शरियाप्रमाणे शिक्षा देण्याचा कायदा त्वरित अंमलात आणावा. अशा मागणीसह इतर मागण्यांचे निवेदन मुजीब सौदागर यांच्या नेतृत्वाखाली निलंगा येथील उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत देशाच्या पंतप्रधानांना देण्यात आले.

Dr Priyanka Reddy rape case
उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
author img

By

Published : Nov 30, 2019, 8:26 PM IST

लातूर- पशुवैद्यकीय डॉक्टर तरुणीचा बलात्कार करून जिवंत जाळणाऱ्या आरोपींना त्वरित फाशीची शिक्षा द्या. तसेच संपूर्ण देशातील बलात्कारातील आरोपींचे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना मुस्लीम शरियाप्रमाणे शिक्षा देण्याचा कायदा त्वरित अंमलात आणावा. अशा मागणीसह इतर मागण्यांचे निवेदन निलंगा येथील उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत देशाच्या पंतप्रधानांना देण्यात आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, हैदराबाद येथील पशुवैद्यकीय डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून जिवंत जाळण्याचा संपूर्ण माणुसकीला काळीमा फासण्याचा प्रकार घडला आहे. यातील आरोपींचे व संपूर्ण देशात बलात्कारांतील जेवढे आरोपी आहेत त्यांचे फास्ट ट्रॅक कोर्टात खटले चालवून मुस्लीम शरियाप्रमाणे शिक्षा देण्यात यावी. जेणेकरून यानंतर निर्भया, असिफा यांचा छळ होऊ नये व बळी जाऊ नये, अशा घटनांना आळा बसावा, असे निवेदन मुजीब सौदागर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. या निवेदनावर मुजीब सौदागर, अनिल जाधव, गोविंद सूर्यवंशी, सुभानी खान, तुषार सोमवंशी, इरशाद आलम शेख, हिरा कादरी, महेश ढगे, सोहेल शेख, अमन शेख, जुनेद सौदागर, अक्रम शेख, महेश तुरे, हरीश इंगळे, कादरी मुजमिल, पन्नालाल पटवारी, जुबेर शेख यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते व नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. चारही आरोपींना एकाच वेळी सर्वांसमक्ष फाशी द्यावी, अशी मागणी करत उपविभागीय अधिकारी विकास माने यांना निवेदन देण्यात आले.

Intro:हैद्राबाद येथिल डॉ प्रियंका रेड्डी यांच्यावर बलत्कार करूनठार मारणा-या नराधमाना भर चौकात फाशी द्या निलंग्यात कार्यकर्त्यांचे प्रशासनाला निवेदन Body:डॉ प्रियंका रेड्डी यांच्यावर बलात्कार करून जीवंत जळणाऱ्या आरोपींना त्वरीत फाशीची शिक्षा द्या

डॉ प्रियंका रेड्डी या तरुणीचा बलात्कार करून जिवंत जाळणाऱ्या आरोपींना त्वरित फाशीची शिक्षा देणे व संपूर्ण देशातील बलात्कारांतील आरोपींचे खटले फास्ट्रेक कोर्टात चालवून दोषींना मुस्लिम शर्यतीप्रमाणे शिक्षा देण्याचा कायदा त्वरित आमलात आणावे अशा मागणीसह इतर मागण्यांचे निवेदन निलंगा येथील उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत देशाचे प्रधान मंत्री यांना देण्यात आले. याबाबत सविस्तर माहिती अशी की हैदराबाद येथील डॉ प्रियंका रेड्डी यांचा सामूहिकपणे बलात्कार करून जिवंत जाळण्याचा संपूर्ण माणुसकीला काळीमा फासण्याचा प्रकार घडला आहे. यातील आरोपींचे व संपूर्ण देशात बलात्कारांतील जेवढे आरोपी आहेत, त्यांचे फास्ट्रेक कोर्टात खटले चालवून मुस्लीम शर्यती प्रमाणे शिक्षा देण्यात यावे जेणेकरून यानंतर निर्भया, असिफा, प्रियंका अशा देशाच्या मुलींचा छळ व बळी जाऊ नये अशा घटनांना आळा बसावा असे निवेदन मुजीब सौदागर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. या निवेदनावर मुजीब सौदागर, अनिल जाधव,गोविंद सूर्यवंशी,सुभानी खान, तुषार सोमवंशी, इरशाद आलम शेख,हिरा कादरी,महेश ढगे,सोहेल शेख,अमन शेख,जुनेद सौदागर, अक्रम शेख,महेश तुरे,हरीश इंगळे, कादरी मुजमिल, पन्नालाल पटवारी,जुबेर शेख,यांसह विविध सामाजिक संघटना चे कार्यकर्ते व नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.Conclusion:चारही आरोपींना एकाच वेळी सर्मवासमक्ष फाशी द्यावी अशी मागणी करत उपविभागीय अधिकारी विकास माने यांना दिले निवेदननिवेदनावर शेकडो कार्यर्त्यांच्या सह्या
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.