लातूर - एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा सर्वच क्षेत्रातून निषेध व्यक्त होत आहे. निलंग्यातही मुस्लीम समाजातर्फे वारिस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच, वारिस पठाण मुर्दाबाद, वारिस पठाण हाय हाय, अशा घोषणा देत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली.
हेही वाचा - दिल्ली भेटीनंतर मुख्यमंत्र्यांची वर्षावर तातडीची बैठक, शरद पवारांसह अजित पवारांची उपस्थिती
हेही वाचा - झटापटीत घडली लासलगाव जळीत घटना, आरोपीवर दाखल होणार गुन्हा
भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेला गालबोट लागेल असे वक्तव्य पठाण यांनी केले होते. त्यांच्या वक्तव्यामुळे समस्त भारतातील हिंदू लोकांच्या भावाना दुखावल्या आहेत. या देशात विविधतेत एकता आहे. परंतु, अशा लोकांमुळे विविध धर्मांमध्ये वाद निर्माण होतात. यासाठी निलंगा येथील समस्त मुस्लीम बांधवांच्या वतीने शहरातील शिवाजी महाराज चौकामध्ये वारिस पठाण यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच, त्यांच्या विरोधी जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी माजी नगरध्यक्ष हमीद शेख, नगरसेवक इरफान सय्यद, इस्माईल लदाफ हसन चाऊस यांच्यासह शहरातील अनेक मुस्लीम बांधव आंदोलनात सहभागी झाले होते.