ETV Bharat / state

इंदूरचा प्रयोग लातुरात, कचऱ्यापासून होणार खतनिर्मिती - कचरा

लातूर शहरात इंदूरच्या धरतीवरील कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रयोग राबवला जाणार आहे. राज्यातील हा पहिला प्रयोग असून आजपासून या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

latur
author img

By

Published : Feb 11, 2019, 12:01 PM IST

लातूर - कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न प्रत्येक शहराला भेडसवत राहिला आहे. मात्र, या समस्येवर लातूर मनपाने जालीम उपाय शोधून काढला आहे. लातूर शहरात इंदूरच्या धरतीवर कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रयोग राबवला जाणार आहे. राज्यातील हा पहिला प्रयोग असून आजपासून या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

शहरातील जवळपास ४० टक्के कचरा एकाच ठिकाणी आणून ही प्रक्रिया केली जाणार आहे. हा प्रयोग प्रभाग ११ मधील शासकीय जागेत होत आहे. भाजपचे नगरसेवक शिवकुमार गवळी यांनी कचरा निर्मुलनाचा अभ्यास करुन इंदूर येथील पद्धती राबवण्याची संकल्पना मांडली होती. आज ती प्रत्यक्षात उतरवली जात आहे. यामध्ये शहरातील कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण, प्रक्रिया व खतनिर्मिती प्रकल्प येथील शासकीय कॉलनीतील जागेत उभारण्यात आला आहे. या बंदिस्त जागेत सर्व यंत्रसामुग्री बसवण्यात आली असून आज पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीमध्ये या अनोख्या उपक्रमाला सुरुवात होत आहे.

कचरा संकलित केल्यानंतर त्याचे ओला आणि सुका कचरा असे वर्गीकरण केले जाणार आहे. यामधून प्लॅस्टिक, धातू असे घटक वेगळे करुन प्रक्रिया केली जाणार आहे. एवढेच नाही तर प्रक्रिया करुन तयार झालेले खत नागरिकांच्या घरोघरी मोफत दिले जाणार आहे. या अनोख्या उपक्रमामुळे कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

undefined

Intro:इंदौरचा प्रयोग लातूरात ; कचऱ्यापासून होणार खतनिर्मिती
लातूर - कचरा व्यवस्थानपाचा प्रश्न प्रत्येक शहराला भेडसवणारा राहिला आहे. मात्र, या समस्येवर लातूर मनपाने जालीम उपाय काढला असून इंदौरच्या धरतीवरील प्रयोग लातूर शहरात राबविला जाणार आहे. राज्यातील हा पहिला प्रयोग असून सोमवारपासून या प्रक्रियेला सुरवात होणार आहे.Body:शहरातील जवळपास ४० टक्के कचरा एकाच ठिकाणी एकवटून ही प्रक्रिया केली जाणार आहे. शहर कचरामुक्त करण्यासाठी एक ना अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. भाजपाचे नगरसेवक शिवकुमार गवळी यांनी कचरा निर्मुलनाचा अभ्यास करून इंदौर येथील पद्धती राबविण्याची संकल्पना मांडली आणि आज ती प्रत्यक्षात उतरिवली जात आहे. यामध्ये शहरातील कचऱ्याचे संकलन, वर्र्गीकरण, प्रक्रिया व खतनिर्मिती प्रकल्प येथील शासकीय कॉलनीतील जागेत उभारण्यात आला आहे. या बंधिस्त जागेत सर्व यंत्रसामुग्री बसविण्यात आली असून आज पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीमध्ये या अनोख्या उपक्रमाला सुरवात होत आहे. कचरा संकलीत केल्यानंतर त्याचे ओला आणि सुका कचरा असे वर्गीकरण केले जाणार आहे. यामधून प्लॅस्टिक, धातू असे घटक वेगळे करून प्रक्रिया केली जाणार आहे. एवेच नाही तर प्रक्रिया करून तयार झालेले खत नागरिकांच्या घरोघरी मोफत दिले जाणार आहे. या अनोख्या उपक्रमामुळे अस्ताव्यस्त साला जाणाऱ्या कचºयाचा प्रश्न मार्गी लागणार असून एक अनोख्या प्रयोगाची सुरवात लातूर मनपा करीत आहे. हा प्रयोग प्रभाग ११ मधील शासकीय जागेत होत आहे. कचराडेपोमुळे शहरालगत असलेल्या शेतजमिनींनाही धोका निर्माण झाला होता. यापद्धतीमुळे दुहेरी फायदा होणार आहे.Conclusion:सोमवारपासून या प्रक्रियेला सुरवात होत असूून यामध्ये सातत्य ठेवण्याची अपेक्षा लातूरकर व्यक्त करीत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.