ETV Bharat / state

लातुरात पुन्हा दुष्काळी सावट, केवळ 16 टक्केच पेरण्या - दुष्काळी स्थिती

गेल्या दोन वर्षपासूनची दुष्काळी स्थिती आहे. यंदाही पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे खरिपातील पेरण्या  खोळंबल्या आहेत. शिवाय, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 221 दलघमी क्षमतेच्या मांजरा धरणात भर पावसाळ्यात मृतसाठाच शिल्लक राहिला आहे. धरणात सध्या केवळ 8.5 दलघमी पाणीसाठा आहे. त्यामुळे 10 दिवसातून एकदा शहराला पाणीपुरवठा केला जात आहे.

लातुरात पुन्हा दुष्काळी सावट, केवळ 16 टक्केच पेरण्या
author img

By

Published : Jul 16, 2019, 8:22 AM IST

लातूर- जिल्ह्यात गेल्या दोन वर्षपासूनची दुष्काळी स्थिती आहे. यंदाही पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे खरिपातील पेरण्या खोळंबल्या आहेत. शिवाय, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 221 दलघमी क्षमतेच्या मांजरा धरणात भर पावसाळ्यात मृतसाठाच शिल्लक राहिला आहे. धरणात सध्या केवळ 8.5 दलघमी पाणीसाठा आहे. त्यामुळे 10 दिवसातून एकदा शहराला पाणीपुरवठा केला जात आहे.

लातुरात पुन्हा दुष्काळी सावट, केवळ 16 टक्केच पेरण्या

आजमितीला जिल्ह्यातील 138 लघु-मध्यम प्रकल्प कोरडेठाक झाले आहेत. येथील खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र हे 6 लाख 24 हजार 805 हेक्टर असून 15 जुलै पर्यंत केवळ 1 लाख 5 हजार म्हणजे सरासरीच्या 16.80 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर, पावसाची सरासरी ही 802 मिमी असून आतापर्यंत केवळ 120 मिमी पाऊस म्हणजे सरासरीच्या तुलनेत 15 टक्केच पाऊस बरसला आहे.

जिल्ह्यातील दहाही तालुक्यांकडे पावसाने पाठ फिरवली आहे. आतापर्यंत एकही समाधानकारक पाऊस झाला नसून अत्यल्प पावसाच्या जोरावर शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. मात्र, आता उगवून आलेल्या पिकांची जोपासना करायची कशी, असा सवाल उपस्थित झाला आहे. त्यामुळे पिके कोमजली असून शेतकरी हतबल झाला आहे. भर पावसाळ्यात दिवस उजडताच सूर्य दर्शन आणि रात्रभर टिपूर चांदणे यामुळे पावसाचे वातावरण निर्माण होत नसल्याचे चित्र आहे. शिवाय पावसाने हुलकावणी दिल्याने पहिलीच पेरणी लांबणीवर पडली होती. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेला बळीराजा दुबार पेरणी करण्यास धजावणार नाही, अशी स्थिती आहे.

मांजरा धरण हे उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्याच्या क्षेत्रात आहे. मात्र, या ठिकाणीही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने हे धरण मृतसाठ्यातच आहे. गतवर्षी 15 जुलैपर्यंत 250 मिमी पाऊस झाला होता. तर त्या तुलनेत 130 मिमी पावसाची घट यंदा झाली आहे. त्याचा परिणाम पेरणीवर झाला आहे. दडी मारलेल्या पावसामुळे खरीप हंगाम वाया जातो की काय, अशी धास्ती शेतकऱ्यांच्या मनात बसली आहे.

Intro:लातुरात सरासरीच्या तुलनेत 13 टक्के पाऊस अन 16 टक्के पेरण्या
लातूर : गेल्या दोन वर्षपासूनची दुष्काळी स्थिती आणि यंदाही पावसाने दिलेली उघडीप यामुळे खरिपातील पेरण्या तर खोळंबल्या आहेतच शिवाय लातूर शहराला पाणीपुरवठा करणारे 221 दलघमी पाणीसाठ्याचे मांजरा धरण भर पावसाळ्यात मृतसाठ्यात आहे. या धरणात केवळ 8.5 दलघमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे 10 दिवसातून एकदा शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. तर जिल्ह्यातील 138 लघु- मध्यम प्रकल्प कोरडेठाक आहे. खरीपाचे सर्वसाधारण क्षेत्र हे 6 लाख 24 हजार 805 हेक्टर असून 15 जुलै पर्यंत केवळ 1लाख 5 हजार म्हणजे सरासरीच्या 16.80 टक्के क्षेत्रावर पेरा झाला आहे. तर पावसाची सरासरी ही 802 मिमी असून आतापर्यंत केवळ 120 मिमी पाऊस म्हणजे सरासरीच्या तुलनेत 15 टक्के पाऊस बरसला आहे.

Body:जिल्ह्यातील दहाही तालुक्यांमध्ये पावसाने पाठ फिरवलेली आहे. आद्यपर्यंत एकही समाधानकारक पाऊस झाला नसून अत्यल्प पावसाच्या जोरावर शेतकऱ्यांनी पेरणी केली खरी मात्र आता उगवण झालेल्या पिकांची जोपासना करायची कशी असा सवाल उपस्थित झाला आहे. त्यामुळे पीक कोमजली असून शेतकरी हतबल झाला आहे. भर पावसाळ्यात दिवस उजडताच सूर्य दर्शन आणि रात्रभर टिपूर चांदण यामुळे पावसाचे वातावरण ही निर्माण होत नाही. शिवाय पावसाने हुलकावणी दिल्याने पहिलाच पेरा लांबणीवर पडला होता त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेला बळीराजा दुबार पेरणी करण्यास धजावणार नाही अशी स्थिती आहे. मांजरा धरण हे उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्याच्या क्षेत्रात आहे. मात्र, या ठिकाणीही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने हे धरण मृतसाठ्यातच आहे. गतवर्षी 15 जुलै पर्यंत 250 मिमी पाऊस झाला होता तर त्या तुलनेत पेक्षा 130 मिमी पावसाची घट यंदा झाली आहे. त्याचा परिणाम पेरणीवर झाला आहे.

Conclusion:हंगामाच्या सुरवातीपासूनच लातूर जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे पाणीसंकट कायम असून खरीप हंगाम वाया जातो की काय ही धास्ती शेतकऱ्यांच्या मनात आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.