ETV Bharat / state

'....तर लॉकडाऊनचा चौथा टप्पाही लागू होईल'

लॉकडाऊन लागू करून ४५ दिवस उलटले आहेत. या सबंध काळात ओढावलेल्या परिस्थितीने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पण माणसाचा जीव महत्वाचा असल्याने हे नियम पाळावे लागत आहेत.

ministerr amit deshmukh
ministerr amit deshmukh
author img

By

Published : May 9, 2020, 1:41 PM IST

लातूर - सध्या राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू आहे. यामध्ये अनेक उद्योग-व्यवसायांना सुट देण्यात आली आहे. परंतु, भविष्यातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली तर लॉकडाऊनचा चौथ्या टप्प्यालाही सामोरे जावे लागणार असल्याचे संकेत पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत.

लॉकडाऊन लागू करून ४५ दिवस उलटले आहेत. या सबंध काळात ओढावलेल्या परिस्थितीने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पण मणसाचा जीव महत्वाचा असल्याने हे नियम पाळावे लागत आहेत. जिल्ह्यात २२ कोरोना रुग्ण असून त्यांच्यावर उदगीर येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे आँरेज झोनमधून रेडकडे न जाता लातूर ग्रीन झोनमध्ये येण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच नियमांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन देशमुख यांनी केले आहे.

सोशल डिस्टन्स यासारखे नियम आता लादण्यापेक्षा त्याचा स्वत:हून अवलंब करणे ही काळाची गरज झाली आहे. कोरोनाशी लढा देत असताना अर्थचक्रही सुरू होण्याच्या दृष्टीने निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळेच उदगीर वगळता इतरत्र उद्योग-व्यवसायांना मुभा देण्यात आली आहे. याकरिता दिवसही ठरवून दिले आहेत तर ग्रामीण भागात सर्वच उद्योग व्यवसाय सुरू झाल्याने आर्थिक चक्र सुरू झाले आहे. मात्र, नागरिकांनी सोशल डिस्टन्स पाळणेही गरजेचे आहे. ग्रामीण भागात जलसंधारण, रस्ते, विहीरी, शेततळी यासारखी कामे सुरू झाली आहेत. शहरातील नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. शिवाय कवचकुंडल म्हणून कार्यरत असलेल्या नर्सेस, पोलीस अधिकारी-कर्मचारी, सफाई कामगार यांच्यावर होणारे हल्ले हे निंदणीय आहेत. यावर राज्य सरकारने कठोर पाऊले उचलली आहेत. कोरोनावर लस काढण्यासाठी वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. परंतु, सध्या तरी कोणताही पर्याय नसल्याने प्रत्येकाने सामाजिक अंतर ठेऊन कोरोनाला दूर ठेवणेच महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

अन्यथा ज्या भागात रुग्ण वाढतील त्या ठिकाणी लॉकडाऊनचा चौथा टप्पाही लागू करावा लागेल असेही संकेत पालकमंत्री अमित देशमुख यांनी फेसबूकच्या माध्यमातून संवाद करताना दिले आहेत.

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची स्थिती, जिल्हा प्रशासनाने घेतलेले निर्णय आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याच्या दृष्टीने कोणती पाऊले उचलली जातील आदी बाबींचा उलगडा त्यांनी केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.