ETV Bharat / state

जेनेरिक मेडिकल 'जनरल'साठी पण लाभार्थी मर्यादितच; जनजागृतीचा आभाव अन् खासगी डॉक्टरांचा हस्तक्षेप

author img

By

Published : Dec 12, 2020, 10:04 AM IST

काळाच्या ओघात शासकीय योजना या अडगळीला पडतात. यामध्ये प्रत्येक वेळी प्रशासनाचीच उदासीनता असेल असे नाही. मात्र नागरिकांनीही सतर्क राहून या योजनांचा लाभ घेणे आवश्यक आहे. जेनेरिक मेडिकलच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला होता. पण दोन वर्षांनंतरही रुग्णांच्या नातेवाईकांचा ओढा या औषधालयांकडे असल्याचे चित्र नाही.

little response from people to generic medical at latur
जेनेरिक मेडिकल 'जनरल'साठी पण लाभार्थी मर्यादितच; जनजागृतीचा आभाव अन् खासगी डॉक्टरांचा हस्तक्षेप

लातूर - आरोग्यावर होणारा खर्च आणि सर्वसामान्य जनतेची आर्थिक परिस्थिती पाहता जेनेरिक मेडिकलच्या माध्यमातून दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. दोन वर्षांपूर्वी सवलतीच्या दरात औषध ही जेनेरिक मेडिकलवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पण जनजागृतीचा आभाव आणि वैद्यकीय रुग्णालयांचे खासगीकरण यामुळे या जेनेरिक मेडिकल पेक्षा ओढा आहे, तो खासगी मेडिकलवर. त्यामुळे सरकारचा उद्देश तरी साध्य होणार की नाही याबाबत साशंका उपस्थित होत आहे.

बदलत्या परिस्थिती नुसार मूलभूत गरजानंतर प्राधान्य दिले जाते ते आरोग्याकडे. दिवसेंदिवस यावरील खर्च हा वाढतच आहे. म्हणून जेनेरिक मेडिकल उभारून सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. कोणत्याही प्रकारच्या ब्रँडची औषधे नाहीत. पण त्यामध्ये कोणती कमीही नाही अशी जेनेरिक औषधालय उभारण्यात आली आहेत. या ठिकाणी रुग्णांना 30 ते 40 टक्के रकमेत सूट मिळते. लातूर जिल्ह्यात अशी 41 जेनेरिक औषधालय आहेत. विषेश म्हणजे सर्वच्या सर्व सुरू ही आहेत. काळाच्या ओघात जनजागृती होत असून काही प्रमाणात का होईना नागरिक आता या मेडिकलची पायरी चढू लागले आहेत. पण ही संख्या तुलनेने खूप कमी आहे. सर्व प्रकारच्या औषधांचा पुरवठा या ठिकाणी केला जातो. शिवाय 2 शहराच्या रचनेनुसार या औषधालयांची संख्या ठरवली जाते.

जेनेरिक मेडिकल 'जनरल'साठी पण लाभार्थी मर्यादितच....

रुग्णांच्या नातेवाईकांची मानसिकता आणि खासगी डॉक्टरांचा स्वार्थ

लातूर शहरात 14 औषधालय आहेत. यामध्ये सर्वात अडसर ठरत आहे ती रुग्णांच्या नातेवाईकांची मानसिकता आणि खासगी डॉक्टरांचा स्वार्थ. कमी किंमतीचे म्हटले ते हलक्या प्रतीचे असा समज आजही कायम आहे. पण येथील दर्जाबाबत खुद्द सरकारने सांगूनही नागरिक दुर्लक्ष करीत आहेत. तर खासगी डॉक्टर हे विशिष्ट ब्रँडचीच औषधे सांगतात. त्यामुळे जेनेरिक औषधालायकडे न जाता जास्त किमतीने का होईना पण ब्रँड असलेल्याच औषधांची खरेदी केली जाते. शिवाय अनेक डॉक्टरांचेच मेडिकल आहेत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांच्या खिशाला कात्री, स्वतःची कमाई अशी मानसिकता ही डॉक्टरांची आहे. पण या औषधालायला घेऊन सरकारही मोठी जनजागृती करीत आहे. पण नागरिकांनीही त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देणे आवश्यक आहे.

नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचं

खासगी मेडीकलमधील दर आणि जेनेरिक मेडिकल मधील दर यामध्ये 50 टक्केहून अधिकची तफावत आहे. शिवाय डॉक्टरांनी केवळ रोगावर उपचार म्हणून त्याचे कंटेन देणे गरजेचे आहे. फार्मासिस्ट हे औषधें देण्याचे काम करतात. परंतु आपल्याकडे डॉक्टरच ब्रँडचे नाव टाकून गोळ्या देतात. त्यामुळे खासगी मेडिकलमध्येच त्याची खरेदी केली जाते. कमी किंमत असूनही जेनेरिक मेडिकलवर कमी वर्दळ असते. तर खासगी दवाखान्यालागतची मेडिकल हे बहरलेली असतात. आता दोन वर्षानंतर बदल होत आहे. पण यामध्ये नागरिकांनी अधिक सतर्क असणे आवश्यक आहे.

30 ते 40 टक्के सूट अन् दर्जाही तोच
जेनेरिक आणि खासगी मेडिकल मध्ये फरक एवढाच आहे की, खासगी मेडिकलवर एका विशिष्ट ब्रँडची नावे असतात. तर दुसरीकडे जेनेरिक येथे कोणत्याही नावाशिवाय थेट औषधेच असतात. असे असले तरी या दोन्हीचा दर्जा हा सारखाच असल्याचे अन्न-औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. एवढे सर्व काही काही असूनही या मेडीकलची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहचणे आवश्यक आहे.

लातूर जिल्ह्यात 41 मेडिकल, सर्वच्या सर्व आहेत सुरू
लातूर जिल्ह्यात 41 जेनेरिक मेडिकल ही दोन वर्षांपूर्वी उभारण्यात आली होती. आजही ती कायम आहेत. पण नागरिकांचा प्रतिसादही मिळणे आवश्यक आहे. सरकारने ठरवून दिलेली सर्वच औषधांचा पुरवठा या मेडिकलमधून केला जात आहे.

खासगी डॉक्टरांची भूमिकाही महत्वाची
दवाखाना तिथे मेडिकल ही स्थिती निर्माण झाली आहे. शिवाय अनेक ठिकाणची मेडिकल हे डॉक्टरांचीच असतात. त्यामुळे अर्थार्जन अधिक व्हावे याकरिता रुग्णांना औषधांचा कंटेन दिला जात नाही. तर थेट औषधांच्या ब्रँडचे नाव लिहून दिले जाते. त्यामुळे आर्थिक नुकसान तर होत आहे.

हेही वाचा - ऑइलमिलच्या गोडाऊनला आग ; 70 लाखांचा बरदाना जळून खाक

हेही वाचा - कोरोनाच्या लसीसाठी स्वतंत्र इमारत; लातूर परिमंडळातून चार जिल्ह्यात लसीचा होणार पुरवठा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.