ETV Bharat / state

संपूर्ण मराठवाड्यात राबविला जाणार लातूरचा 'हा' पॅटर्न; विभागीय आयुक्त केंद्रेकरांचे निर्देश - लातूर पॅटर्न

लातूरमध्ये वेळेत आणि नियमित सुविधा मिळावी याकरिता जिल्हा प्रशासनाने 100 घरातील प्रमुख प्रतिनिधींचा एक व्हाट्सअप‌ॅ गृप केला आहे. मागणीप्रमाणे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची जबाबदारी ही अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. शिवाय या ग्रुपमध्ये जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांचा देखील समावेश आहे.

latur corona update
लातूर कोरोना अपडेट
author img

By

Published : May 30, 2020, 7:53 PM IST

Updated : May 30, 2020, 9:35 PM IST

लातूर - कोरोनाचे संकट टाळण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवत आहे. मात्र, असे असतानाही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, लातूर जिल्ह्यात 27 ठिकाणी कंन्टेटमेंट झोन करण्यात आले आहेत. या भागातील नागरिकांना अत्यावश्यक सोयी-सुविधा घरपोच करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नामी शक्कल लढवली आहे. या भागातील नागरिकांचा एक व्हाट्सअ‌ॅ‌प गृप बनवून यावरच वस्तूंची मागणी केली जाते आणि नेमून दिलेले अधिकारी त्याची पूर्तता करतात.

अभिनव उपक्रमाचे स्वागत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनीही स्वागत केले असून, ही संकल्पना मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात राबविण्याचे निर्देश दिले आहेत. लातूर जिल्ह्यात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असून, शनिवारपर्यंत 66 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाचा संसर्ग इतर नागरिकांना होऊ नये म्हणून कंन्टेटमेंट झोन आखून देण्यात आले आहेत. रुग्णांच्या संख्येनुसार जिल्ह्यात 27 ठिकाणी हे झोन असून या परिसरावर अधिकारी-कर्मचारी यांची करडी नजर आहे. शिवाय या नागरिकांना अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा देखील मनपा किंवा नगरपालिकेच्या वतीने केला जात आहे.

वेळेत आणि नियमित सुविधा मिळावी याकरिता जिल्हा प्रशासनाने 100 घरातील प्रमुख प्रतिनिधींचा एक व्हाट्सअप‌ॅ गृप केला आहे. मागणीप्रमाणे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची जबाबदारी ही अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. शिवाय या ग्रुपमध्ये जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांचा देखील समावेश असून, ग्रुपची जबाबदारी ही तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगर पालिका मुख्याधिकारी यांच्यावर आहे. त्यामुळे नियमित वेळी वस्तूंचा पुरवठा होत आहे. शिवाय या झोनमधील नागरिकांना बाहेर येण्याची आवश्यकता राहत नाही. या अनोख्या उपक्रमाची माहिती विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना देण्यात आली होती. त्यानुसार हा उपक्रम इतर जिल्ह्यातही राबवण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

Last Updated : May 30, 2020, 9:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.