ETV Bharat / state

बहुमताच्या दिवशीच लातुरातील राष्ट्रवादीच्या आमदारांचे कळेल 'मत'

सध्याच्या सत्तापेचामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उदगीरचे संजय बनसोडे आणि अहमदपूरचे बाबासाहेव पाटील हे दोन्हीही आमदार चर्चेत आले आहेत. आमदार पाटील आणि आमदार बनसोडे हे दोघेही पवारांसोबत असल्याचे सांगत आहेत. मात्र, द्विधा मनस्थितीमुळे हे दोन्ही आमदार नेमके कुणाचे, असा सवाल उपस्थित होत आहे.

author img

By

Published : Nov 25, 2019, 3:23 PM IST

बहुमताच्या दिवशीच कळेल लातुरातील राष्ट्रवादीच्या आमदारांचे 'मत'

लातूर - यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला अभूतपूर्व यश मिळाले आहे. सध्याच्या सत्तापेचामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उदगीरचे संजय बनसोडे आणि अहमदपूरचे बाबासाहेव पाटील हे दोन्हीही आमदार चर्चेत आले आहेत. हे दोन्ही आमदार नेमके कोणाकडून आहेत? याबाबत अद्याप तिढा कायम आहे.

शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी दरम्यान हे दोन्हीही आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत होते, तर पुन्हा त्यांनी आपली भूमिका बदलून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबरच असल्याचे सांगितले आहे. उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांना तर विमानतळावरूनच राष्ट्रवादीच्या बैठकीच्या ठिकाणी आणले गेले होते. त्यामुळे पवारांसोबत असल्याचे सांगणारे हे दोन्ही आमदार नेमके कोणत्या पवारांसोबत आहेत, हे बहुमत सिद्ध करण्याच्या दिवशीच समजेल.

हेही वाचा - नुतन महापौरांचा अभिनव उपक्रम; जलसंवर्धनासाठी केली जनजागृती

जिल्ह्यात काँग्रेस आणि भाजप या दोन्ही प्रमुख पक्षात खरी लढत मानली जाते. यंदाच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनेही या प्रमुख पक्षाशी बरोबरी करीत अहमदपूर येथे बाबासाहेब पाटील यांनी तर उदगीरमध्ये संजय बनसोडे यांनी विजय मिळवला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या झंझावाती प्रचारामुळे आणि तिकीट वाटपात भाजपचे गणित चुकल्याने २ ठिकाणी राष्ट्रवादीला यश मिळाले होते. मात्र, सत्तापेच असा काही निर्माण झाला की, हे आमदार कुणाचे? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

हेही वाचा - निलंग्यात वादातून चाकूहल्ला; एक जखमी, आरोपीस अटक

कारण उपमुख्यमंत्री अजित पवार हे शपथ घेत असताना बाबासाहेब पाटील हे तर उपस्थितच होते. शिवाय राष्ट्रवादीच्या बैठकीच्या दरम्यान मुंबई विमानतळावर असलेल्या संजय बनसोडे यांना शिवसैनिकांनी बैठकीच्या ठिकाणी दाखल केले होते. यांनतर बाबासाहेब पाटील आणि संजय बनसोडे हे दोघेही पवारांसोबत असल्याचे सांगत आहेत. मात्र, द्विधा मनस्थितीमुळे हे दोन्ही आमदार नेमके कुणाचे, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे बहुमत सिद्ध करण्याच्या दिवशीच या दोघांची भूमिका सर्वांसमोर येणार हे नक्की.

हेही वाचा - हरियाणाकडे जाणाऱ्या भाविकांचा राजस्थानमध्ये अपघात, लातुरातील 5 तर उस्मानाबादेतील एकाचा मृत्यू

Intro:बहुमताच्या दिवशीच कळेल लातुरातील राष्ट्रवादीच्या आमदारांचे 'मत'
लातूर - यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला अभूतपूर्व यश मिळाले आहे. सध्याच्या सत्तापेचामुळे जिल्ह्यातील उदगीर आणि अहमदपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्हीही आमदार चर्चेत आले आहेत. शपथविधी दरम्यान हे दोन्हीही आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बरोबर होते तर पुन्हा त्यांनी आपली भूमिका बदलून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबरच असल्याचे सांगितले आहे. उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांना तर विमानतळावरूनच राष्ट्रवादीच्या बैठकीच्या ठिकाणी आणले गेले होते. त्यामुळे पवारांसोबत असल्याचे सांगणारे हे दोन्ही आमदार नेमके कोणत्या पवारांसोबत हे तर बहुमत सिद्ध करण्याच्या दिवशीच समजेल.
Body:जिल्ह्यात काँग्रेस आणि भाजपा या दोन प्रमुख पक्षात खरी लढत मानली जाते. यंदाच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनेही या प्रमुख पक्षाशी बरोबरी करीत अहमदपूर येथे बाबासाहेब पाटील यांनी तर उदगीरमध्ये संजय बनसोडे यांनी विजय मिळवला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या झंझावाती प्रचारामुळे आणि तिकीट वाटपात भाजपचे गणित चुकल्याने दोन ठिकाणी राष्ट्रवादीला यश मिळाले होते. मात्र, सत्ता पेच असा काही निर्माण झाला कि, हे आमदार कुणाचे असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार हे शपथ घेत असताना बाबासाहेब पाटील हे तर उपस्थित होतेच शिवाय राष्ट्रवादीच्या बैठकीच्या दरम्यान मुंबई विमानतळावर असलेल्या संजय बनसोडे यांना शिवसैनिकांनी बैठकीच्या ठिकाणी दाखल केले होते. यांनतर बाबासाहेब पाटील आणि संजय बनसोडे हे दोघेही पवारांसोबत असल्याचे सांगत आहेत. मात्र, द्विधा मनस्थितीमुळे हे दोन आमदार नेमके कुणाचे असा सवाल उपस्थित होत आहे... Conclusion:बहुमत सिद्ध करण्याच्या दिवशीच या दोघांची भूमिका सर्वांसमोर येणार आहे हे नक्की..!
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.