ETV Bharat / state

महापौर पदासाठी भाजप-काँग्रेसमध्ये रस्सीखेच; ओबीसीसाठी आरक्षण - लातूर महानगरपालिका

२२ नोव्हेंबरला महापालिकेच्या महापौर उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार आहे. यासाठी सोमवारी भाजपकडून ४, तर काँग्रेसतर्फे ४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून दोन्ही गटात या पदांसाठी रस्सीखेच सुरू आहे.

महापौर पदासाठी भाजप-काँग्रेसमध्ये रस्सीखेच
author img

By

Published : Nov 19, 2019, 2:25 PM IST

लातूर - राज्यातील महापालिकेच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत बुधवारी काढण्यात आली. या सोडतीमध्ये लातूर शहर महापालिकेचे महापौरपद हे मागसप्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे.

महापौर पदासाठी भाजप-काँग्रेसमध्ये रस्सीखेच

अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर आता २२ नोव्हेंबरला महापौर, उपमहापौरपदासाठीची निवडणूक होणार आहे. यासाठी सत्ताधारी भाजपसह काँग्रेस गोटातून मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सोमवारी पहिल्याच दिवशी महापौर पदासाठी भाजपकडून ४ तर काँग्रेसकडून महापौर व उपमहापौर पदासाठी प्रत्येकी ४ नामनिर्देशन पत्र घेण्यात आले आहेत. तर, या महापौरपदासाठी सत्ताधारी भाजपसह काँग्रेस गोटातून वरचढ सुरू आहे.

हेही वाचा - निलंग्यात एका महिलेने दिला तिळ्यांना जन्म, पालकांसमोर पालनपोषणाचा बिकट प्रश्न

त्यामुळे २२ नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसकडून काही फोडाफोडीचे राजकारण झाले तर, काँग्रेसचा महापौर होण्याची संधी आहे. मात्र, यापूर्वी फोडाफोडीच्या राजकारणाला काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी फारसा थरा दिला नव्हता. मात्र, सध्याची बदलती राजकीय स्थिती पाहता जर या निवडणुकीत असे काही झाले. येथे काँग्रेस पक्षाच्या महापौराची वर्णी लागू शकते. मात्र, सध्यातरी नगरसेवकांमध्ये याबाबत चर्चा होत असून या निवडणुकीबाबत पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर तर काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी फारसे लक्ष घातले नसल्याची माहिती आहे.

हेही वाचा - माणुसकीच्या भिंतीचे रूपांतर बँकेत

Intro:महापौर पदासाठी भाजप-काँग्रेसमध्ये रस्सीखेच ; ओबीसीसाठी आरक्षण
लातूर - अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर आता २२ नोव्हेंबर रोजी महापौर, उपमापौरांची निवड होणार आहे. याकरिता सत्ताधारी भाजपासह काँग्रेस गोठातून मोठ्या हलचाली सुरू झाल्या आहेत. सोमवारी पहिल्याच दिवशी महापौर पदासाठी भाजपाकडून चार तर काँग्रेसकडून महापौर व उपमहापौर पदासाठी प्रत्येकी चार नामनिर्देशन पत्र घेण्यात आली आहेत.
Body:मे २०१७ रोजी झालेल्या निवडणुकांमध्ये प्रथमच भाजपाला विजय मिळवता आला होता. असे असले तरी ७० नगरसेवक असलेल्या महानगरपालिकेत भाजपाचे ३६, काँग्रेसचे ३३ तर राष्ट्रवादीकडून १ असे चित्र होते. मात्र, भाजप नगरसेवक शिवकुमार गवळी यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले आहे तर राष्ट्रवादीचे एकमेव असलेले नगरसेवक राजा मनियार हे वंचित बहुजन आघाडीत दाखल झाले आहेत. त्यामुळे २२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसकडून काही फोडाफोडीचे राजकारण झाले तर काँग्रेसचा महापौर होण्याची संधी आहे. मात्र, यापुर्वी फोडाफोडीच्या राजकारणाला काँग्रेसचे आ. अमित देशमुख फारसा थरा दिला नव्हता. परंतू सध्याची बदलती राजकीय स्थिती पाहता जर या निवडणुकीत असे काय झाले तर काँग्रेसच पक्षाच्या महापौराची वर्णी लागू शकते. सध्या तरी नगरसेवकांमध्येच चर्चा होत असून या निवडणुकीबाबत पालकंमत्री संभाजी पाटील निलंगेकर तर काँग्रेसचे आ. अमित देशमुख यांनी फारसे लक्ष घातलेले नाही. Conclusion:सोमवारच्या पहिल्या दिवशी आठ नामनिर्देशनपत्रे घेऊन जाण्यात आली आहेत. लक्ष आहे ते आता २२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीकडे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.