लातूर - जिल्हा दुष्काळाच्या छायेत असताना मनपाकडूनही अन्याय होत असल्याची भावना शहरातील व्यापारी वर्गात आहे. वाढीव वीजबिल, मालमत्ता कर यांसारख्या समस्यांना त्रासून शुक्रवारी व्यापाऱ्यांनी बंद पुकारला. त्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेत सकाळच्या सत्रात कमालीची शांतता होती. ऐन निवडणुकांच्या तोंडावर व्यापाऱ्यांनी मनपाच्या कारभाराबाबत प्रश्न उपस्थित केल्याने सत्ताधारी भाजपाची डोकेदुखी वाढली आहे.
हेही वाचा - अंधश्रद्धेचा कळस! पाऊस थांबविण्यासाठी बेडूक दाम्पत्याचा घटस्फोट
बाजारपेठेतील गाळ्यांच्या मालमत्ता करात मनपाने वाढ केली आहे. यासंदर्भात व्यापाऱ्यांनी अनेकवेळा आंदोलने केली होती. शिवाय हे प्रकरण न्यायालयातही गेले होते. मात्र, वाढीव कारभाराबद्दलचा निर्णय कायम ठेवण्यात आला होता. तर दुसरीकडे वीजबिलातील अनियमितता यालाही शहरवासिय त्रस्त आहेत. गेल्या 6 महिन्यापासून महिन्याकाठी येणाऱ्या बिलात वाढ होत आहे. मात्र, याकडे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे, आर्थिक लूट होत असल्याचा आरोप येथील व्यापाऱ्यांनी केला आहे.
हेही वाचा - पुण्यात विसर्जन मिरवणुकीचा उत्साह शिगेला; न्यायालयाचा आदेश झुगारून पुण्यात डिजेचा दणदणाट
जिल्ह्यात दुष्काळजन्य स्थिती असताना प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू असल्याने नागरिकांच्या समस्या वाढत आहेत. वीज, पाणी, रस्ते यासारख्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष होत असताना दुसरीकडे मालमत्ता कर वाढविले जात आहे. त्यामुळे आज व्यापाऱ्यांसह विविध संघटना आणि काँग्रेसच्या वतीने लातूर बंदची हाक दिली होती. मुख्य बाजारपेठेतील दुकाने बंद होती. तर इतर ठिकाणीही रॅली काढून बंदचे आवाहन करण्यात आले होते. यावेळी मनपा प्रशासनाला देण्यात विविध मागण्यांचे निवेदन आले आहे.
हेही वाचा -
तर शहरवासियांच्या वतीने हा बंद पुकारला असला तरी यामध्ये गाळे असणाऱ्या व्यापाऱ्यांचा अधिकचा सहभाग होता. त्यामुळे आता निवडणुकांच्या तोंडावर मनपा काय निर्णय घेणार ? याकडे लक्ष लागले आहे.