ETV Bharat / state

लातूर शहरातील अपक्ष उमेदवाराची शक्कल, अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ - santosh sabade

अपक्ष उमेदवाराने उमेदवारी अर्ज भरताना चक्क 10 रुपयांची नाणी आणली. ही चिल्लर मोजता मोजता अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ आले. निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रथम ही रक्कम स्वीकारण्यास नकार दिला. मात्र, समर्थकांनी गोंधळ घालताच रक्कम जमा करून घेतली.

अपक्ष उमेदवाराने अर्ज भरण्यासाठी चिल्लर नाणी आणली
author img

By

Published : Oct 4, 2019, 3:14 PM IST

Updated : Oct 4, 2019, 7:37 PM IST

लातूर - गल्लीत गोंधळ अन् दिल्लीत मुजरा... या चित्रपटातील नारायण वाघ यांनी उमेदवारी अर्ज भरताना आणलेली चिल्लर सर्वांना ज्ञात आहे. तसाच काहीसा प्रकार लातूरतील अपक्ष उमेदवार संतोष साबदे यांनी केला आहे. उमेदवारी अर्ज भरताना द्यावयाची 10 हजार अनामत रक्कम साबदे यांनी चक्क 10 रुपयांची नाणी आणली. मग काय ही चिल्लर मोजता मोजता अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ आले. निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रथम ही रक्कम स्वीकारण्यास नकार दिला. मात्र, समर्थकांनी गोंधळ घालताच रक्कम जमा करून घेतली.

अपक्ष उमेदवाराची शक्कल अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ

निवडणुकीच्या काळात लक्ष वेधून घेण्यासाठी कोण काय करेल हे सांगता येत नाही. तसाच प्रकार लातूर शहर विधानसभा मतदारसंघात घडला आहे. अपक्ष म्हणून संतोष साबदे हे लातूर शहरातून नशीब आजमावत आहेत. मात्र, त्यांनी एक नोट, एक वोट असा प्रचार करून गेल्या पंधरा दिवसापासून नाणे जमा करण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार 10 रुपयांची नाणी अशी 10 हजाराची रक्कम त्यांच्याकडे जमा झाली होती. शुक्रवारी ते लातूर येथील तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले. मात्र, त्यांच्याकडील चिल्लर पाहून अधिकाऱ्यांनी अनामत रक्कम घेण्यास विरोध केला. मात्र, उपस्थित कार्यकर्त्यांनी हुज्जत घातली. तसेच लेखी स्वरूपात अधिकाऱ्यांचे म्हणणे देण्याची मागणी करताच सर्व अधिकारी चिल्लर मोजण्यास लागले.

Intro:बाईट : संतोष साबदे

अपक्ष उमेदवाराची शक्कल अन अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ
लातूर : गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा या चित्रपटातील नारायण वाघने उमेदवारी अर्ज भरताना आणलेली चिल्लर सर्वांना ज्ञात असेलच... तसाच काहीसा प्रकार लातूरतील अपक्ष उमेदवार संतोष साबदे यांनी केला. उमेदवारी अर्ज भरताना द्यावयाची 10 हजार अनामत रक्कम म्हणून साबदे यांनी चक्क 10 रुपयांची नाणी आणली. मग काय ही चिल्लर मोजता मोजता अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ आले. निवडणूक विभागतील अधिकाऱ्यांनी प्रथम ही रक्कम स्वीकारण्यास नकार दिला मात्र, समर्थकांनी गोंधळ घालताच रक्कम जमा करून घेतली.
Body:निवडणुकीच्या काळात लक्ष वेधून घेण्यासाठी कोण काय करेल हे सांगता येत नाही.तसाच प्रकार लातूर शहर विधानसभा मतदारसंघात घडला आहे. अपक्ष म्हणून संतोष साबदे हे लातूर शहरातून नशीब आजमावत आहेत. मात्र, त्यांनी एक नोट, एक वोट असा प्रचार करून गेल्या पंधरा दिवसापासून नाणे जमा करण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार 10 रुपयांची नाणी अशी 10 हजाराची रक्कम त्यांच्याकडे जमा झाली होती. शुक्रवारी ते लातूर येथील तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले. मात्र, त्यांच्याकडील चिल्लर पाहून अधिकाऱ्यांनी अनामत रक्कम घेण्यास विरोध केला. मात्र, उपस्थित कार्यकर्त्यांनी हुज्जत घालताच आणि लेखी स्वरूपात अधिकाऱ्यांचे म्हणणे मागताच सर्व अधिकारी चिल्लर मोजण्यास लागले. Conclusion:अखेर साबदे यांनी दिलेली रक्कम अधिकाऱ्यांनी स्वीकारली आणि अर्ज दाखल करून घेण्यात आला.
Last Updated : Oct 4, 2019, 7:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.