ETV Bharat / state

किल्लारी भूकंप 1993 : घरांचे पुनर्वसन झाले, मनाची पुनर्बांधणी कशी करणार? - निळकंठेश्वर मंदीर लातूर

किल्लारी व परिसरातील गावे साखर झोपेत असताना पहाटे 03 वाजून 56 मिनिटांनी भूकंप झाला. काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. 6.4 रिश्टर स्केलच्या या भूकंपाने लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील 27 हजाराहून अधिक घरे भुईसपाट झाली. काळाने तब्बल 7228 जणांना आपल्या कवेत घेतले.

किल्लारी भूकंप
किल्लारी भूकंप
author img

By

Published : Sep 30, 2021, 6:26 AM IST

लातूर - 30 सप्टेंबर, 1993. अनंत चतुर्दशीचा तो दिवस. गणेश विसर्जन करून परतलेली किल्लारी व परिसरातील गावे शांतपणे झोपली होती. मात्र गावकरी साखर झोपेत असताना पहाटे 03 वाजून 56 मिनिटांनी भूकंप झाला. काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. 6.4 रिश्टर स्केलच्या या भूकंपाने लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील 27 हजाराहून अधिक घरे भुईसपाट झाली. काळाने तब्बल 7228 जणांना आपल्या कवेत घेतले. तब्बल 16 हजार नागरिक जखमी झाले. 16 हजाराहून अधिक पशुधनही या भूकंपात गाडले गेले. काही सेकंदात औसा आणि उमरगा तालुक्यात मृत्यूचे भीषण तांडव अनुभवायला मिळाले. का झाले? कसे झाले? कुणालाच कळत नव्हते. होती ती भयाण शांतता.

हेही वाचा - Killari Earthquake : भूकंपातील अवशेषांचे जतन करण्यासाठी बांधण्यात आलेल्या 'वस्तु संग्रहालयाची' अवस्था बिकट

चुकतो काळजाचा ठेका

आज किल्लारीतील भूकंपाच्या घटनेला 28 वर्ष पूर्ण झालीत. आजही तो दिवस आठवला की अनेकांच्या काळजाचा ठेका चुकतो. शासनाने भूकंपग्रस्तांचे स्मरण करण्यासाठी स्मृतीस्तंभ व उद्यान उभारले. मात्र त्याची अवस्था पाहून शासनालाही भूकंपग्रस्तांचे स्मरण आहे की नाही, असा प्रश्न पडतो.

ग्रामदैवत सुरक्षित

भूकंपामध्ये संपूर्ण किल्लारी गाव उद्ध्वस्त झाले होते. पण आश्चर्य म्हणजे किल्लारीचे ग्रामदैवत असलेल्या निळकंठेश्वराचे मंदीर 'जैसे थे' होते. या पिंडीतून गोड पाण्याचा झरा सदैव वाहत असतो. पण ज्यावेळी या पिंडीतील पाणी आटते त्यावेळी गावावर नैसर्गिक संकट कोसळते, अशी ग्रामस्थांची भावना आहे.

हेही वाचा - नांदेडमध्ये जाणवलेल्या भूकंपाचे केंद्र यवतमाळ; मात्र जीवितहानी नाही - जिल्हाधिकारी

समस्या कायम

शासनाने भूकंपग्रस्त 52 गावांचे पुनर्वसन केले. मात्र इथल्या समस्या भूकंपाच्या 28 वर्षांनंतरही अद्याप कायम आहेत. या समस्या कधी दूर होणार, असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे. भूकंपामध्ये हजारो घरे भुईसपाट झाली. अख्खे कुटुंब उद्ध्वस्त झाली. जे बचावले ते सुदैवानेच. शेकडो जण जायबंदी झाले, त्यांना अपंगत्व आले. भलेही आता घरांचे पुनर्वसन झाले असेल पण मनाची पुनर्बांधणी कोणालाच आणि कशाचाही माध्यमातून करता येणार नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.