ETV Bharat / state

शिपाई चालेल पण, शेतकरी नको; लग्नाच्या बाजारातही 'बळीराजा'चा भाव घसरला... - marrige

पूर्वी शेती हा सर्वोत्त व्यवसाय समजला जायचा. नोकरी करणे प्रतिष्ठेचे समजले जात नव्हते. पण, काळ बदलला तसे प्रतिष्ठेचे मापदंडही बदलले. आता शेती करणे हे कमी प्रतीचे समजले जात आहे. शेतीसंबंधी सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका शेतकऱयांना आर्थिक आघाडीवर बसत आहे. पण, तो सांस्कृतिक आणि सामाजिक स्तरावरही बसत आहे.

लग्नेच्छुक शेतकरी तरुण हतबल झाले आहेत
author img

By

Published : Mar 28, 2019, 3:22 PM IST

Updated : Mar 29, 2019, 3:42 PM IST

लातूर - एकवेळ शिपाई नवरा चालेल, एखाद्या दुकानात काम करणारा नोकर चालेल. पण, शेतकरी नवरा नको असे लग्नाळू मुली आता बिनदिक्कत म्हणू लागल्या आहेत. शेती व्यवसायाचा घसरलेला दर्जा, त्यामुळे शेतकऱ्यांचीखालावलेली आर्थिक परिस्थिती शेतकरी मुलांच्या लग्नात मोठा अडथळा ठरत आहे. याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने केला आहे.

शेतकरी तरुणांच्या प्रतिक्रिया ईटीव्ही भारतने घेतल्या. यावेळी त्यांनी आपली कैफीयत मांडली

पूर्वी शेती हा सर्वोत्त व्यवसाय समजला जायचा. नोकरी करणे प्रतिष्ठेचे समजले जात नव्हते. पण, काळ बदलला तसे प्रतिष्ठेचे मापदंडही बदलले. आता शेती करणे हे कमी प्रतीचे समजले जात आहे. शेतीसंबंधी सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका शेतकऱयांना आर्थिक आघाडीवर बसत आहे. पण, तो सांस्कृतिक आणि सामाजिक स्तरावरही बसत आहे. याचा सगळ्यात मोठा परिणाम लग्न संस्थेत जाणवत आहे. लग्नेच्छुक शेतकरी मुलांना मुली सरळ नाकारत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

लातूर जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आढळून आली. लातूर तालुक्यातील भिसे वाघोली या गावात ईटीव्ही भारतने संवाद साधला. तेव्हा लग्नेच्छुक शेतकरी तरुणांनी आपल्या व्यथा मांडल्या. लग्नासाठी अनेक मुलींच्या घरचे उंबरठे ही मुले झिजवत आहेत. पण, एकही मुलगी वा तिचे पालक ताकास तूर लागू देत नाहीत. या नकाराचे कारण फक्त शेतकरी असणे हेच आहे.

आपला नवरा हा शिपाई असला तरी चालेल, पण शेतकरी नको अशी भूमिका मुली आणि त्यांचे पालक घेत आहेत. शेती विकून एखादा व्यवसाय सुरु करण्याचे सल्लेही शेतकरी तरुणांना देण्यात येत आहेत. भिसे वाघोली गावात लग्नाचे वय झालेले अनेक तरुण दिसून आले. आज प्रत्येक गावात लग्नेच्छुक ४० ते ५० तरुण लग्नाविना अडकून बसले आहेत. वयाचे ३० - ३५ वर्षे ओलांडली तरी लग्न जमत नाही. त्यामुळे हे तरुण निराशेच्या गर्तेत लोटले जात आहेत.

तरुण पोरांनी बदलत्या काळानुसार बदलले पाहिजे. शेतीवर अवलंबून न राहता छोटा मोठा व्यवसाय करावा असा सल्ला आता गावातील वडीलधारी मंडळी देत आहेत.

Intro:*This Story give to telugu desk*
शिपाई परवडला पण शेतकरी नवरा नको ग बाई...!
लातूर: शेती उत्पादनाची ना शाश्वती...ना शेतकऱ्याला समाजात पथ. निसर्गाच्या लहरीपणा आणि शेती व्यवसायाकडे बघण्याचा बदललेला दृष्टिकोन यामुळे भावी शेतकरी 'वारांची' चिंता वाढत आहे. तरुण शेतकऱ्यांच्या काय आहेत व्यथा जाणून घेण्याचा ईटीव्ही भारताने प्रयत्न केला असता ग्रामीण भागातील विदारक चित्र समोर आले आहे. मुलगा केवळ शेती व्यवसाय करीत असल्याचे समजताच त्याच्या वार्षिक उत्पादनाचा...कौटुंबिक पार्श्वभूमीचा विचार न करता मुलींकडून आणि तिच्या पालकांकडून नकार कळवळा जात आहेत. त्यामुळे शेती व्यवसायबरोबर ग्रामीण भागातील तरुणांचे भावीतव्यही धोक्यात आहे.

Body:पूर्वी शेती उत्तम, मध्यम व्यवसाय आणि कनिष्ठ नौकरी समजली जात होती. मात्र, काळाच्या ओघात परिस्थिती बदली आणि उत्तम दर्जा असलेली शेती आज दर्जाहीन झाली आहे. प्रत्येक खेडेगावात 30 ते 35 वयोगटातील जवळपास 40 ते 50 तरुणांची लग्ने रखडली आहेत. हीच स्थिती लातूर तालुक्यातील भिसे वाघोली या गावात पाहवयास मिळाली. आणि त्याला कारण आहे आपल्या देशाचा मुख्य व्यवसाय असलेली शेती. या गावची लोकसंख्या 6 हजाराच्या घरात. अधिकतर तरुण सुशिक्षित परंतु बेकार. त्यामुळे घरच्या शेतात राबून आपली हौसही पूर्ण करतात. मात्र लग्नाच्या वेळी शेतीक्षेत्र किती आहे... कोरडवाहू आहे की बागायती...या शेतीमधून वर्षाकाठी उत्पन्न किती मिळते याची चौकशी दूरच मुलगा उत्तम शेती करतो म्हणले तरी मुलीसह तिचे नातेवाईक नापसंती दर्शीवतात. शासकीय नौकरी, व्यावसायिक, उद्योजक एवढेच नाही तर कपड्याच्या दुकानावर कामाला असेलेला चालेल परंतु शेतकरी नको अशी धारणा मुलींची व त्यांच्या पालकांची झाली आहे. शिवाय ग्रामीण भागात सोई-सुविधांचा अभाव, हलक्या दर्जाची जीवनशैली यामुळे छोटा- मोठा व्यवसाय का असेना पण तो शहरात राहणारा असावा अशाही अपेक्षा केवळ शहरी भागातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील मुलीही बाळगू लागल्या आहेत.

Conclusion:बदलत्या जीवनपद्धतीमुळे मुलींच्या अपेक्षा वाढणे साहजिक आहे. मात्र, केवळ शेती व्यवसायावर अवलंबून न राहता तरुणांनी व्यवसायाकडेही मार्गस्थ होने ही काळाची गरज असल्याचे वडीलधारी मंडळी सल्लाही देत आहेत.
Last Updated : Mar 29, 2019, 3:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.