ETV Bharat / state

आता लातूरला पाईपलाईनद्वारे घरगुती गॅसचा पुरवठा, राज्यातील 7 शहरांत लातूरचा समावेश

राज्यातील 7 शहरात पाईपलाईनद्वारे गॅसचा पुरवठा केला जातो. त्यात आता लातूरचाही समावेश करण्यात आला असून लवकरच लातूरकरांनाही गॅस पुरवठा पाईपलाईनद्वारे केला जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. पाईपलाईनद्वारे घरगुती गॅस देणारे मराठवाड्यातील पहिले शहर ठरले आहे. लातूर शहरातील पाईपलाईनद्वारे घरगुती गॅस देण्याचे काम पूर्ण होताच शहरालगतच्या गावातही पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा केला जाणार आहे.

भूमीपूजन करताना
भूमीपूजन करताना
author img

By

Published : Oct 17, 2021, 8:28 PM IST

लातूर - राज्यातील 7 शहरात पाईपलाईनद्वारे गॅसचा पुरवठा केला जातो. त्यात आता लातूरचाही समावेश करण्यात आला असून लवकरच लातूरकरांनाही गॅस पुरवठा पाईपलाईनद्वारे केला जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.

लातूर शहरात अशोका गॅस एजन्सीच्या माध्यमातून पाईपलाईनद्वारे घरगुती गॅस पुरवठा प्रकल्पाचे भूमिपूजन नुकतेच झाले. राज्यातील केवळ 7 शहरात पाईपलाईनद्वारे गॅसपुरवठा होत आहे. त्यात आता लातुरचाही समावेश झाल्याने पाईपलाईनद्वारे घरगुती गॅस देणारे मराठवाड्यातील पहिले शहर ठरले आहे. लातूर शहरातील पाईपलाईनद्वारे घरगुती गॅस देण्याचे काम पूर्ण होताच शहरालगतच्या गावातही पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा केला जाणार आहे.

औसा तालूक्यात गॅस इंधनावरची औद्योगिक वसाहत

दिवंगत विलासराव देशमुख केंद्रात मंत्री असताना लातूर जिल्ह्यातून नैसर्गिक गॅसची पाईपलाईन नेण्याचे काम सुरू झाले होते. त्याचवेळी या पाईपलाईनला लातूर जिल्ह्यात आऊटलेट देण्यात यावे, असे त्यांनी सुचवले होते. आज ती योजना प्रत्यक्षात साकारली जात आहे. शिवाय गॅस इंधनावर आधारीत औसा तालुक्यात औद्योगिक वसाहत सुरू करावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे लातूरचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

हेही वाचा - लातूरात 'एमआयएम'ला खिंडार; पाच नगरसेवकांसह जिल्हाध्यक्ष 'राष्ट्रवादी'त दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.