ETV Bharat / state

लातूरची गंजगोलाई झाली शंभर वर्षाची; नव्या रुपाने वैभवात भर - ganjgolai @ 100

लातूरच्या बाजारपेठेत असलेली गंजगोलाई शहराचे एक वेगळेपण राहिलेली आहे. शहरातील विविध भागातून येणारे सोळा रस्ते या ठिकाणी एकत्र येतात. शहरात कोणत्याही भागातून प्रवेश केला तरी गोलाईच्या ठिकाणी येणे शक्य आहे. गंजगोलाई शहराच्या अनेक घटनांची साक्षीदारही राहिली असून आता या इमारतीला १०० वर्षे पूर्ण होत आहेत.

लातूरची गंजगोलाई झाली शंभर वर्षाची
लातूरची गंजगोलाई झाली शंभर वर्षाची
author img

By

Published : Feb 26, 2020, 3:00 PM IST

लातूर - शहराची ओळख आणि सबंध लातूरकरांची अस्मिता असलेल्या गंजगोलाईच्या इमारतीला यंदा १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे शहराचे वैभव असलेल्या या गंजगोलाई इमारतीला ऐतिहासिक लूक देण्याचे काम जोमात सुरू आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली ही वास्तू अधिक आकर्षक व्हावी याकरिता जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली इमारतीचे कामकाज सुरू आहे.

लातूरच्या गंजगोलाईने गाठली शंभरी

लातूरच्या बाजारपेठेत असलेली गंजगोलाई शहराचे एक वेगळेपण राहिलेली आहे. शहरातील विविध भागातून येणारे सोळा रस्ते या ठिकाणी एकत्र येतात. शहरात कोणत्याही भागातून प्रवेश केला तरी गोलाईच्या ठिकाणी येणे शक्य आहे. गंजगोलाई शहराच्या अनेक घटनांची साक्षीदारही राहिली असून आता या इमारतीला १०० वर्षे पूर्ण होत आहेत.

हेही वाचा - लातूरमध्ये भाजपचे पालकमंत्र्यांविरोधात धरणे आंदोलन; दिशाभूल केल्याचा आरोप

१०० वर्षांपूर्वी फियाजुद्दीन यांनी या गोलाईचे डिझाईन केले होते. याच गोलाईमध्ये जगदंबा मातेचे मंदिर असून नवरात्र महोत्सवात हा परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघालेला असतो. गेल्या ४ महिन्यांपासून या गोलाईच्या इमारतीला ऐतिहासिक रुप देण्याच काम सुरू आहे. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी या कामाची पाहणी केली असून याठिकाणी वाढलेली अतिक्रमणे तसेच अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. आगामी ४ महिन्यांमध्ये ही गोलाई नव्या रुपात समोर येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

१०० कोटींचा आराखडा

या भागातील रस्ते, वीज आणि इतर सोई-सुविधांकरिता १०० कोटींचा आरखडा तयार करण्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी सुचित केल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले आहे. त्यामुळे या वास्तूचे रुपडे बदलण्याचे काम सुरू झाले असून ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याच्या भावना लातूरकरांकडून व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या निर्णयाविरोधात लातूर उपकेंद्रात विद्यार्थ्यांचे आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.