लातूर - औसा तालुक्यातील माळकोंडजी येथील हणमंत राजेंद्र ढेंबरे (वय 38) वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली.
मृत ढेंबरे यांना एक एकर शेती असून त्यांच्यावर सोसायटीचे व खाजगी सावकाराचे कर्ज आहे. सततची नापिकी, सोसायटी आणि खासगी सावकाराच्या तगाद्यामुळे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली. हणमंत ढेंबरे यांच्या पश्चात आई, पत्नी आणि चार मुली असे कुटुंब आहे.
हेही वाचा - लातुरात एका माकडाचा 100 जणांना चावा; जळकोटमध्ये माकडाची दहशत
या घटनेची माहिती मिळताच किल्लारी पोलीस ठाण्याचे अंमलदार गणेश यादव यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. वैजनाथ बळीराम विभूते यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.