ETV Bharat / state

लातूर जिल्ह्यात 81 कोरोनाबाधित वाढले; 1073 जणांची कोरोनावर मात - कोरोना अपडेट इन लातूर

लातूरमधील कोरोनाबाधितांची संख्या 1786 वर पोहोचली आहे. सध्या जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या आता 630 एवढी झाली आहे. 1073 जणांनी कोरोनावर मात केली आहे.आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे 83 व्यक्तींना जीव गमवावा लागला आहे.

Latur corona update
लातूर कोरोना अपडेट
author img

By

Published : Jul 29, 2020, 9:47 AM IST

लातूर- जिल्ह्यात आतापर्यंत 13 हजार 417 व्यक्तींच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. मंगळवारी 81 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे लातूरमधील कोरोनाबाधितांची संख्या 1786 वर पोहोचली आहे. सध्या जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या आता 630 एवढी झाली आहे. शिवाय रॅपिड टेस्ट ला ही सुरवात झाल्याने संभाव्य रुग्णांचे अहवाल लवकर प्राप्त होऊ लागलेत.

लातूरमध्ये गेल्या 13 दिवसांपासून लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णांची साखळी तोडण्यास यश येईल असा आशावाद होता. मात्र, काही दिवसांचे अहवाल वगळता कोरोनाबाधितांच्या वाढीत सातत्य राहिलेले आहे. जिल्ह्यात सध्या 630 रुग्णांवर उपचार सूरु आहेत तर 1073 जणांनी कोरोनावर मात केली आहे. व्यक्तींची तपासणी अधिक वेगाने व्हावी यादृष्टीने दोन दिवसांपासून रॅपिड टेस्ट केली जात आहे. मंगळवारी या माध्यमातून टेस्ट केलेल्या 40 जणांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आले आहेत.

आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे 83 व्यक्तींना जीव गमवावा लागला आहे. सर्वधिक मृत्यूचे प्रमाण हे लातूर शहरात आहे. रुग्णांचे मनोबल वाढावे यादृष्टीने कोविड केअर सेंटर मध्ये मनोरंजनात्मक कार्यक्रम घेतले जात आहेत. वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांमुळे जिल्ह्यात 15 दिवसाचे लॉकडाऊन लागू करण्यात आले होते त्याचे दोन दिवस उरले आहेत.

वाढत्या रुग्णांची साखळी तोडण्यास पाहिजे त्या प्रमाणात यश मिळाले नसल्याने आता लॉकडाऊनमध्ये वाढ केली जाणार का पाहावे लागणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.