ETV Bharat / state

रिमझिम पावसाने पिकांना दिलासा; उर्वरित पेरणीसाठी मोठ्या पावसाची प्रतिक्षा कायम - आशा

जिल्ह्यात खरीपाचे सर्वसाधारण क्षेत्र हे 6 लाख 24 हजार 805 हेक्टर आहे. 19 जुलैपर्यंत सरासरीच्या 25 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पावसाची सरासरी ही 802 मिमी आहे. तर आतापर्यंत केवळ 130 मिमी म्हणजे सरासरीच्या तुलनेत 20 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामावर टांगती तलवार कायम आहे.

रिमझिम पावसाने पिकांना दिलासा
author img

By

Published : Jul 20, 2019, 11:21 AM IST

लातूर - मोठ्या प्रतीक्षेनंतर शहरासह जिल्ह्यात शनिवारी रिमझिम पावसाने हजेरी लावल्यामुळे पिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. उष्ण व दमट वातावरणामुळे पेरणी झालेली पिके सुकण्याच्या मार्गावर होती. मात्र, या रिमझिम पावसाने थोड्या प्रमाणात दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. तर उर्वरित पेरणीसाठी मोठ्या पावसाची गरज आहे.

रिमझिम पावसाने पिकांना दिलासा; उर्वरित पेरणीसाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम

जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र हे 6 लाख 24 हजार 805 हेक्टर आहे. 19 जुलैपर्यंत सरासरीच्या 25 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पावसाची सरासरी ही 802 मिमी आहे. तर आतापर्यंत केवळ 130 मिमी म्हणजे सरासरीच्या तुलनेत 20 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामावर टांगती तलवार कायम आहे.

जिल्ह्यात सोयाबीन या पिकावर शेतकऱ्यांचा भर असतो. मात्र, पावसाने पाठ फिरवल्याने जुलै महिन्याच्या अखेरही पेरण्यांचा खोळंबा झाला आहे. शनिवारी लातूर शहरासह ग्रामीण भागात रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने पिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, रखडलेल्या पेरण्यांसाठी अद्यापही मोठ्या पावसाची प्रतिक्षा कायम आहे. सध्या, जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे पावसाबाबत शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

Intro:रिमझिम पावसाने पिकांना दिलासा ; उर्वरित पेरणीसाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम
लातूर : मोठ्या प्रतीक्षेनंतर लातूर शहरासह जिल्ह्यात शनिवारी पावसाने हजेरी लावली. या रिमझिम पावसामुळे पेरणी झालेल्या क्षेत्रातील पिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तर उर्वरित पेरणीसाठी मोठ्या पावसाची गरज आहे. उष्ण व दमट वातावरणामुळे पेरा झालेली पिके सुकू लागली होती मात्र, या रिमझिम पावसाने दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.

Body:खरीपाचे सर्वसाधारण क्षेत्र हे 6 लाख 24 हजार 805 हेक्टर असून 19 जुलै पर्यंत सरासरीच्या 25 टक्के क्षेत्रावर पेरा झाला आहे. तर पावसाची सरासरी ही 802 मिमी असून आतापर्यंत केवळ 130 मिमी पाऊस म्हणजे सरासरीच्या तुलनेत 20 टक्के पाऊस बरसला आहे. त्यामुळे खरीपावर टांगती तलवार कायम आहे. जिल्ह्यात सोयाबीन या पिकावर शेतकऱ्यांचा भर असतो मात्र, पाठ फिरविल्याने जुलै अखेरही पेरण्याचा खोळंबा झाला आहे. शनिवारी लातूर शहरासह ग्रामीण भागात रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने पिकांना दिलासा मिळाला खरा परंतु रखडलेल्या पेरण्यासाठी अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

Conclusion:सध्या जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून पावसाबाबत शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.