ETV Bharat / state

निलंगा तालुक्यातील डोंगरगावात ग्रामस्थांचे उपोषण, ग्रामसेवकाच्या गैरकारभाराच्या चौकशीची मागणी - gramsevak kishor reddy corruption

ग्रामसेवक किशोर रेड्डी हे स्वत:च्या गावी राहूनच गावातील कारभार हाकत आहेत. त्यांच्या या प्रकारामुळे गावातील कामे ठप्प पडली आहेत. याबाबत गावकऱ्यांनी रेड्डी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून उद्धटपणे उत्तरे देण्यात येतात. त्यामुळे रेड्डी यांच्या मनमानी कारभारामुळे गावकरी संतापले आहेत. गावकऱ्यांनी त्यांच्या गैरप्रकारांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

उपोषण करताना डोंगरगाव ग्रामस्थ
उपोषण करताना डोंगरगाव ग्रामस्थ
author img

By

Published : Sep 3, 2020, 4:07 PM IST

Updated : Sep 3, 2020, 4:36 PM IST

(निलंगा) लातूर - विकास कामांबाबत ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांना विश्वासात न घेता डोंगरगाव हालसी येथील ग्रामसेवकाने परस्पर ग्रामविकास निधीचा अपहार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याप्रकरणी ग्रामस्थांनी ग्रामसेवकाच्या गैरकारभाराची चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. मागणीसाठी गावकरी मंगळवारपासून (१ सप्टेंबर) डोंगरगाव हालसी ग्रामपंचायतीसमोर उपोषणाला बसले आहेत.

किशोर रेड्डी असे ग्रामसेवकाचे नाव आहे. ते गावपातळीवरच्या विकास कामांबाबत ग्रामसभेत ठराव पारित करत नाहीत व परस्पर निधीचा अपहार करतात, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शिवाजी गुंडाजी हजारे यांच्या नेतृत्वाखाली गावातील महिला व पुरुष उपोषणावर बसले आहेत.

ग्रामसेवक किशोर रेड्डी हे स्वत:च्या गावी राहूनच गावातील कारभार हाकत आहेत. त्यांच्या या प्रकारामुळे गावातील कामे ठप्प पडली आहेत. याबाबत गावकऱ्यांनी रेड्डी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांना उद्धटपणे उत्तरे देण्यात येते. त्यामुळे रेड्डी यांच्या मनमानी कारभारामुळे गावकरी संतापले आहे. गावकऱ्यांनी त्यांच्या गैरप्रकारांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

गावकऱ्यांचा प्रश्नांना ग्रामसेवकाची टाळाटाळ

पाणी फाऊंडेशन अंतर्गत डोंगरगाव हालसी या गावाला ६ लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले होते. मात्र, या निधीबाबत विचारणा केली असता ग्रामसेवक रेड्डी यांच्याकडून असमाधानकारक उत्तर मिळाले. तसेच, शासनाकडून विकास कामासाठी मिळालेला निधी, त्या अंतर्गत केलेली कामे, घरकुल मंजुरी, विकास कामांची मंजुरी, तेराव्या चौदाव्या वित्त आयोगांतर्गत होणारी कामे अंदाजपत्रकानुसार होणे, महामारीचे अनुदान, त्याचे खर्च तसेच इतर कामे नियमानुसार होतात का हे जाणून घेणे गरजेचे असते. मात्र, ग्रामसेवक याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. ग्रामसेवकाच्या या हरकतीमुळे गावातील विकासकामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

त्यामुळे याप्रकरणी चौकशी व्हावी यासाठी ग्रामस्थ शिवाजी हजारे यांच्यासह माधवराव पाटील, धनराज माने, दिलीप भालेराव, वसंत मोरे यांनी निलंगा प.स. गटविकास अधिकारी अमोल ताकभाते व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, निलंगा पोलीस अधिकारी, लातूर जिल्हाधिकारी, व कासार शिरशी पोलीस ठाणे यांना निवेदन देऊन आमरण उपोषणास मंगळवारपासून (१ सप्टेंबर) सुरुवात केली आहे. उपोषणस्थळी परिसरातील अनेक सामाजिक संघटना व पदाधिकारी यांनी भेट घेऊन उपोषणकर्त्यांशी संवाद साधला व या ठिकाणी त्यांच्या सुरक्षेबाबत त्यांना निवारा, वीज, पाणी उपलब्ध करून देणे व त्यांच्या संरक्षणात कायम महिला व पुरुष पोलिसांची सोय करावी, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा- निलंगा तहसील कार्यालयासमोर मनसेचे धरणे आंदोलन, पीक नुकसान भरपाईसाठी केली घोषणाबाजी

Last Updated : Sep 3, 2020, 4:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.