ETV Bharat / state

लातूर : आता खासगी रुग्णालयातही कोरोनाबाधित रुग्णांवर होणार उपचार - latur corona update

लातुरात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. यामुळे शासकीय रुग्णालय प्रशासनावर मोठा ताण येत होता. म्हणून जिल्ह्यातील खासगी रुग्णालयातही आता कोरोनाबाधितांवर उपचार होणार आहेत. श्रीमती फुलबाई भआऊसाहेब बनसुडे हे रुग्णालय प्रशासनाने कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी ताब्यात घेतले आहे.

private hospital
private hospital
author img

By

Published : Jul 20, 2020, 1:15 PM IST

लातूर - जिल्ह्यात आतापर्यंत शासकीय रुग्णालयातच कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात होते. मात्र, गेल्या 15 दिवसांतील वाढती रुग्णांची संख्या पाहता आता खासगी रुग्णालये जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतली आहेत. शहरातील श्रीमती फुलबाई भाऊसाहेब बनसुडे हे पहिले खासगी रुग्णालय आहे जिथे कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यास सुरुवात झाली आहे.

जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1 हजारांहून अधिक झाली आहे. त्यापैकी शहरात सर्वाधिक रुग्ण असून 128 ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) घोषीत करण्यात आले आहेत. सध्या कोरोनाबाधितांवर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी उपचार सुरू असून शहरातील वेगवेगळ्या भागात विलगिकरण कक्ष करण्यात आले आहेत. मात्र, महानगरपालिका हद्दीतील श्रीमती फुलबाई भाऊसाहेब बनसुडे रुग्णालयामध्येही आता उपचार सुरू झाले आहेत. रविवारी (दि. 19 जुलै) या ठिकाणी एक रुग्ण दाखल करण्यात आला होता. शिवाय महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी या रुग्णालयाची पाहणी केली आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी खासगी डॉक्टरांनी यासाठी स्वतःहून समोर येण्याचे आवाहन केले होते. आता प्रत्यक्ष उपचारास सुरुवात झाल्याने शासकीय रुग्णालयावरील ताणही कमी होणार आहे. खासगी रुग्णालयात सर्व सोई-सुविधा जिल्हा प्रशासनाकडून पुरविल्या जाणार आहेत. गरज पडल्यास आणखी खासगी रुग्णालये उपलब्ध केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले आहे.

दरम्यान, राज्यात रविवारी (दि. 19 जुलै) कोरोनाच्या 9 हजार 518 नव्या रुग्णांचे निदान झाले. एका दिवसात नोंद झालेल्या रुग्णांची ही सर्वोच्च आकडेवारी ठरली. तसेच राज्यात 258 कोरोना रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. रविवारपर्यंत 1 लाख 69 हजार 569 इतके रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 28 हजार 730 सक्रिय (अॅक्टीव्ह) रुग्णांवर उपचार सुरू आहेत,

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.