ETV Bharat / state

लातुरात दुष्काळी परिस्थिती आटोक्यात - जिल्हाधिकारी

author img

By

Published : May 11, 2019, 11:23 AM IST

भविष्यात हीच स्थिती राहिली तर टँकरची संख्या शंभरावर जाईल. मात्र, टँकर सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून टाळाटाळ केली जाणार नाही. मात्र, या टंचाईचा कोणी गैरफायदा घेऊ नये. यामुळे दुष्काळाची पाहणी करूनच उपाययोजना केली जात असल्याचे जी. श्रीकांत यांनी यावेळी स्पष्ट केले

दुष्काळाबाबत बोलताना लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत

लातूर - जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने टँकर आणि अधिग्रहणाच्या प्रस्तावात वाढ होत आहे. दुष्काळजन्य परिस्थिती असली तरी आटोक्यात आहे. मात्र, मागेल तिथे टँकर आणि अधिग्रहणाचा प्रस्ताव दाखल होताच. त्याला मंजुरी देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असल्याचे मत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी व्यक्त केले.

मे महिन्याच्या सुरुवातीपासून दिवसेंदिवस टँकरची मागणी वाढत आहे. आता ६४ टँकरद्वारे ४९ गावांना आणि १३ वाड्या वस्त्यांना पाणीपुरवठा केला जात आहे, तर ४८७ गावांसाठी ६०३ जलस्रोतांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. निवडणुकीच्या काळात पाणीटंचाईकडे थोड्याप्रमाणात दुर्लक्ष झाले असले तरी तालुकानिहाय बैठका घेऊन पाणी टंचाईचा आढावा घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले.

पाणीटंचाईची पाहणी करून गरज असेल त्या ठिकाणी टँकर सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ग्रामीण भागात स्थिती अधिक गंभीर असून उपाययोजना केल्या जात आहेत. विहिरीत उतरून पाणी घेण्याची वेळ लातूरकरांवर येणार नाही. याची दक्षता घेऊन त्वरित उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शेजारच्या जिल्ह्यांमध्ये टँकरची संख्या हजारावर आणि चारा छावणीची संख्या शंभरावर गेली आहे. त्यामुळे दुष्काळ असला तरी परिस्थिती आटोक्यात आहे.

Intro:जिल्ह्यात दुष्काळ मात्र परिस्थिती आटोक्यात : जिल्हाधिकारी
लातूर : जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने टँकरची आणि अधिग्रहणाच्या प्रस्तावात वाढ होत आहे. दुष्काळजन्य परिस्थिती असली तरी आटोक्यात असून मागेल तिथे टँकर आणि अधिग्रहणाचा प्रस्ताव दाखल होताच त्याला मंजुरी देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ असला तरी आटोक्यात असल्याचे मत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व्यक्त केले.

Body:मे महिन्याच्या सुरवातीपासून दिवसेंदिवस टँकरची मागणी वाढत असून आता 64 टँकरद्वारे 49 गावांना आणि 13 वड्या वस्त्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. तर 487 गावांसाठी 603 जलस्रोतांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. निवडणुकीच्या काळात पाणीटंचाईकडे थोड्याप्रमानात दुर्लक्ष झाले असले तरी तालुकानिहाय बैठका घेऊन पाणी टंचाईचा आढावा घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले. पाणीटंचाईची पाहणी करून गरज असेल त्या ठिकाणी टँकर सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ग्रामीण भागात स्थिती अधिक गंभीर असून उपाययोजना केल्या जात आहेत. विहिरीत उतरून पाणी घेण्याची वेळ लातूरकरांवर येणार नाही याची दक्षता घेऊन त्वरित उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शेजारच्या जिल्ह्यांमध्ये टँकरची संख्या हजारावर आणि चारा छावणीची संख्या शंभरावर गेली असताना त्या तुलनेत लातूर सुस्थितीमध्ये आहे. त्यामुळे दुष्काळ असला तरी परिस्थिती आटोक्यात आहे.

Conclusion:भविष्यात हीच स्थिती राहिली तर टँकरची संख्या100 वर जाईल. मात्र, टँकर सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून टाळाटाळ केली जाणार नाही. मात्र, या टंचाईचा कोणी गैरफायदा घेऊ नये यामुळेही पाहणी करूनच उपाययोजना केली जात असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.