ETV Bharat / state

शेतकऱ्यांना पेन्शन देणारा भारत पहिला देश असेल - मुख्यमंत्री

लातूरमध्ये रेल्वे डब्याचा कारखाना होणे ही अभिमानास्पद बाब आहे. यामुळे हजारो तरुणांच्या हाताला काम मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Apr 13, 2019, 1:41 PM IST

लातूर - हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे आहे. दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना सरकारने थेट मदत केली. शेतकऱ्यांना पेन्शन देणारा आपला पहिला देश असणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते लातूर येथे बोलत होते.

फडणवीस म्हणाले, भ्रष्टाचार संपवण्याचे काम मोदींनी केले. स्वच्छ भारतासाठी शौचालय, जन-धन योजनेअंतर्गत बँकेत खाते, उज्वला गॅस वाटपाची अंमलबाजवणी या सरकारने केली आहे. २०२२ पर्यंत एकही व्यक्ती बेघर राहणार नाही. मी मुख्यमंत्री होईल की नाही, हे महत्त्वाचे नाही पण देश वाचवण्यासाठी मोदींच्या सुरक्षित हाती सत्ता देण्याची गरज आहे.

लातूरमध्ये रेल्वे डब्याचा कारखाना होणे ही अभिमानास्पद बाब आहे. यामुळे हजारो तरुणांच्या हाताला काम मिळेल. यामुळे जिल्ह्याचे चित्र बदलत आहे. लातूर जिल्हा भाजपमय होत आहे. त्यामुळे रावण कितीही बलाढ्य असला तरी वानरेच त्यांना संपवतात म्हणत मुख्यमंत्र्यांनी अमित देशमुखांवर टीका केली.

पाकिस्तानला पाकिस्तानमध्ये घुसून मारायची हिम्मत केवळ मोदींमध्येच आहे. जवानांच्या रक्ताचे मोल काय असते हे मोदींनी दाखवून दिले आहे. आत्तापर्यंत केवळ नेतृत्वाकडून परवानगी मिळत नसल्याने पाकिस्थान वरचढ ठरत होता. देशात काँग्रेसची सत्ता आली तर ते सैन्याचे विशेष अधिकार काढून टाकू, असे त्यांच्या जाहीरनाम्यातून म्हणत आहेत. मग जवान शहीद झाल्यावर त्याच्या कुटुंबीयांना काय सांगणार, असा सवाल मुख्यमंत्र्यानी उपस्थित केला.

फडणवीस म्हणाले..
- १२४ अ कलम काढणे म्हणजे देशाच्या विराधात भूमिका
- शेतकऱ्यांना पिकविम्याचे पैसे दिले. एकही तालुका पीक विम्याच्या रकमेपासून वंचित राहणार नाही.
- मराठवाड्यामध्ये वॉटर ग्रीडचा उभारण्याचा संकल्प.
- वाहून जाणारे पाणी गोदावरीमध्ये आणून कायम दुष्काळ मुक्ती करण्याचा मानस आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.