लातूर - जळकोट शहरात काल (मंगळवारी) संविधान दिन साजरा करण्यात आला. महिला संघटना, श्रमजीवी संघटना, संलग्न मानवी हक्क अभियान या सारख्या विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत हा दिन साजरा केला. यावेळी शहरात संविधान दिंडी काढण्यात आली. या दिंडीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली.
हेही वाचा- केवळ फडणवीसच नाहीत, तर 'हे' आहेत देशभरातील 'औटघटके'चे ठरलेले मुख्यमंत्री
दिंडीत विद्यार्थी, वृद्ध महिला, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते. दिंडी दरम्यान संविधानाप्रती घोषणा देत दिंडी पूर्ण शहरात फिरवून पंचायत समितिच्या प्रांगणात दिंडीचा समारोप करण्यात आला आहे. समारोपादरम्यान भारतीय संविधानाविषयी मार्गदर्शन उपस्थितांना करण्यात आले. संविधानाप्रती समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठीची शपथ ही सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली.
दरम्यान, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य, न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता प्रवर्धित करण्याच्या हेतूने दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला भारतीय संविधान समर्पित केले. त्यामुळे 26,नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिवस म्हणून देशात साजरा केला जातो.