ETV Bharat / state

लातूरमध्ये कार आणि बसचा अपघात; अभियंता ठार, चारजण गंभीर जखमी

निलंगा पंचायत समिती जि.प.बांधकाम विभागात कार्यरत असलेले कनिष्ठ अभियंता पंडित माधवराव वाघमारे रा. निलंगा, पंडित डोंगरे, अनिल कांबळे व बलभीम सुर्यवंशी चौघेजण निलंगा येथून शिरूर ताजबंद मार्गे अहमदपूरला जात होते. अहमदपूरहून येणाऱ्या बसला समोरासमोर अपघात झाल्याने वाघमारे यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर चौघांवर उपचार सुरू आहेत.

latur
पंडित माधवराव वाघमारे
author img

By

Published : Nov 26, 2019, 10:15 PM IST

लातूर- निलंगा येथून कार्यालयीन कामकाज उरकून अहमदपूरकडे मार्गस्थ होत असताना बसला अपघात झाल्याने एका कनिष्ठ अभियंत्याचा मृत्यू झाला. तर अन्य तिघेजण जखमी झाले आहेत. कारमधील चौघेही निलंगा येथे पंचायत समिती जि. प. च्या बांधकाम विभागात कार्यरत होते.

निलंगा पंचायत समिती जि.प.बांधकाम विभागात कार्यरत असलेले कनिष्ठ अभियंता पंडित माधवराव वाघमारे रा. निलंगा, पंडित डोंगरे, अनिल कांबळे व बलभीम सुर्यवंशी चौघेजण निलंगा येथून शिरूर ताजबंद मार्गे अहमदपूरला जात होते. अहमदपूरहून येणारी बस क्रमांक एम.एच.४० एन.९६८१ या बसला समोरासमोर अपघात झाल्याने पंडित माधवराव वाघमारे यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर चौघांवर उपचार सुरू आहेत. शिरूर ताजबंद व अहमदपूर रोडवर एच.पी.गॅस गोडाऊन जवळ हा अपघात झाला. यामध्ये पंडित वाघमारे (वय२८) यांचा जागीच मृत्यू झाला. तर अभियंता अजय डोंगरे रा.यवतमाळ व अनिल कांबळे रा.लातूर आणि बलभिम सुर्यवंशी रा.तळेगाव ता.शिरूर अनंतपाळ जि.लातूर हे गंभीर जखमी झाले आहेत. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने लातूर जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. मयत वाघमारे यांचे गेल्या दोन वर्षाखालीच लग्न झाले आहे. अहमदपूर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे.

घटनेची माहिती मिळताच निलंगा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजकुमार मुक्कावार हे तात्काळ कर्मचाऱ्यांसह अहमदपूरला जाऊन या अपघातात जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना उपचारासाठी मदत केली.

Intro:कार - बसचा अपघात ; अभियंता ठार, चारजण गंभीर जखमी
लातूर : निलंगा येथून कार्यालयीन कामकाज उरकून अहमदपूरकडे मार्गस्थ होत असताना समोरून येणाऱ्या बसला अपघात झाल्याने एका कनिष्ठ अभियंत्याचा मृत्यू झाला तर अन्य तिघेजण जखमी झाले आहेत. कारमधील चौघेही निलंगा येथे पंचायत समिती जि. प. च्या बांधकाम विभागात कार्यरत होते.
Body:निलंगा पंचायत समिती जि.प.बांधकाम विभागात कार्यरत असलेले कनिष्ठ अभियंता पंडीत माधवराव वाघमारे रा. निलंगा, पंडीत डोंगरे, अनिल कांबळे व बलभीम सुर्यवंशी चौघेजण निलंगा येथून शिरूर ताजबंद मार्गे अहमदपूरला जात होते. अहमदपूरहून येणारी बस क्रमांक एम.एच.४० एन.९६८१ या बसला समोरासमोर अपघात झाल्याने पंडित माधवराव वाघमारे यांचा जागीच मृत्यू झाला तर इतर चौघांवर उपचार सुरू आहेत. शिरूर ताजबंद व अहमदपूर रोडवर एच.पी.गॅस गोडाऊन जवळ हा अपघात झाला. यामध्ये पंडीत वाघमारे वय २८ वर्षे यांचा जागीच मृत्यू झाला तर अभियंता अजय डोंगरे रा.यवतमाळ व अनिल कांबळे रा.लातूर आणि बलभिम सुर्यवंशी रा.तळेगाव ता.शिरूर अनंतपाळ जि.लातूर हे गंभीर जखमी झाले आहेत. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने लातूर जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. मयत वाघमारे यांचे गेल्या दोन वर्षाखालीच लग्न झाले आहे. अहमदपूर पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे. Conclusion:घटनेची माहिती मिळताच निलंगा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजकुमार मुक्कावार हे तात्काळ कर्मचाऱ्यांसह अहमदपूरला जाऊन या अपघातात जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना उपचारासाठी मदत केली.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.