लातूर - कौटुंबिक वादातून पतीनेच पत्नीची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उदगीर तालुक्यातल्या हैबतपूरमध्ये मंगळवारी ही घटना घडली. हत्या केल्यानंतर पती तसाच पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून राहिला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, पती आणि मृत महिलेच्या सासऱ्याला ताब्यात घेतले आहे.
राऊ राजकुमार गायकवाड असे या मृत महिलेचे नाव आहे. ती दिवाळीनिमित्त माहेरी गेली होती. माहेरून परत आल्यानंतर सध्यांकाळी पती -पत्नीमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने रागाच्या भरात पती राजकुमार गायकवाड याने पत्नीवर कुऱ्हाडीने वार केला. या हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी हा पळून न जाता आपल्या तीन वर्षांच्या मुलासोबत तसाच पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून राहिला. गावातील लोकांना ही घटना समजल्यानंतर त्यांनी आरोपीला कोंडून ठेवले, व घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी आरोपी व त्याच्या वडिलांना ताब्यात घेतले.
हेही वाचा - औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ : निवडणुकीतून १० जणांची माघार, ३५ उमेदवार रिंगणात
हेही वाचा - शेतात काम करणारे पिता-पुत्र बिबट्याच्या हल्ल्यात ठार, परिसरात दहशत