कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यात एकूण १० मतदार संघ येतात. २०१४ विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातून एकून 74 टक्के मतदान झाले होते. या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात चुरशीने ७३.६२ टक्के मतदान झाले आहे.
जिल्ह्यात २०१४च्या निवडणूकीत शिवसेनेने बाजी मारली होती. शिवसेनेचे ६ आमदार निवडून आले होते. तर भाजपचे २, राष्ट्रवादीचे २ आमदार निवडू आले होते. पूर्ण जिल्ह्यात काँग्रेसला आपले खाते सुद्धा खोलता आले नव्हते. यामध्ये शिवसेनेचे वर्चस्व कोल्हापूर जिल्ह्यात निर्माण झाले होते. या निवडणुकीत काँग्रेसची जिल्ह्यात दैयनीय अवस्था झाली होती.
मतदार संघनिहाय २०१४ची स्थिती -
1) चंदगड मतदार संघात २०१४ मध्ये संध्यादेवी कृष्णतराव कुपेकर विजयी झाल्या होत्या त्यांनी नरसिंग पाटील यांचा पराभव केला होता.
2) राधानगरी मतदार संघात २०१४ मध्ये प्रकाश आनंदराव आबीटकर विजयी झाले होते, त्यांनी केपी पाटील यांचा पराभव केला होता.
3) कागल मतदार संघात २०१४ मध्ये मुश्रीफ हसन मियालाल विजयी झाले होते, त्यांनी संजय घाटगे यांचा पराभव केला होता.
4) कोल्हापूर दक्षिण मतदार संघात २०१४ मध्ये अमल महाडिक विजयी झाले होते, त्यांनी सतेज पाटील यांचा पराभव केला होता.
5) करवीर मतदार संघात २०१४मध्ये चंद्रदीप शशिकांत नरके विजयी झाले होते, त्यांनी पी एन पाटील यांचा पराभव केला होता.
6) कोल्हापूर उत्तर मतदार संघात २०१४ मध्ये राजेश विनाकराव क्षीरसागर विजयी झाले होते, त्यांनी सत्यजीत कदम यांचा पराभाव केला होता.
7) शाहुवाडी मतदार संघात २०१४ मध्ये सत्यसजीत बाबासाहेब पाटील विजयी झाले होते, त्यांनी विनय कोरे यांचा पराभव केला होता.
8) हातकणंगले मतदारसंघात २०१४ मध्ये सुजीत वसंतराव मिणचेकर विजयी झाले होते, त्यांनी जयवंत आवळे यांचा पराभव केला होता.
9) इचलकरंजी मतदार संघात २०१४ मध्ये सुरेश गणपतराव हाळवणकर विजयी झाले होते, त्यांनी प्रकाश आवाडे यांचा पराभाव केला होता.
10) शिरोळ मतदार संघात २०१४ मध्ये उल्हास संभाजी पाटील विजयी झाले होते, त्यांनी काँग्रेसचे राजेंद्र पाटील यांचा पराभाव केला होता.
कोल्हापूर जिल्ह्यातील निवडणूक रिंगणातील उमेदवार -
1) चंदगड - संग्राम कुपेकर x राजेश पाटील x शिवाजी पाटील
2) राधानगरी - प्रकाश आनंदराव आबीटकर x के पी पाटील x राहुल देसाई
3) कागल - मुश्रीफ हसन मियालाल x संजयबाबा घाटगे x समरजितसिंह घाटगे
4) कोल्हापूर दक्षिण - अमल महाडिक x ऋतुराज पाटील
5) करवीर - चंद्रदीप शशिकांत नरके x पी एन पाटील
6) कोल्हापूर उत्तर - राजेश विनाकराव क्षिरसागर x चंद्रकांत जाधव
7) शाहुवाडी - सत्यजीत बाबासाहेब पाटील x विनय कोरे
8) हातकणंगले - सुजीत वसंतराव मिणचेकर x अशोकराव माने x राजू जयवंत आवळे
9) इचलकरंजी - सुरेश गणपतराव हाळवणकर x प्रकाश आवाडे x राहुल खंजिरे
10) शिरोळ - उल्हांस संभाजी पाटील x सावकार मदनाईक x राजेंद्र पाटील यड्रावकर
जिल्ह्यातील महत्वाच्या लढती -
करवीर - चंद्रदीप शशिकांत नरके x पी एन पाटील
कोल्हापूर दक्षिण - अमल महाडिक x ऋतुराज पाटील
शाहुवाडी - सत्यसजीत बाबासाहेब पाटील x विनय कोरे
शिरोळ - उल्हांस संभाजी पाटील x सावकार मदनाईक x राजेंद्र पाटील यड्रावकर