कोल्हापूर - जिल्ह्यातील इचलकरंजी शहरात कारमध्ये बसून क्रिकेट सामन्यावर बेटींग घेणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या पथकाने छापा टाकून अटक केली. हर्षवर्धन घोरपडे, विकास खंडेलवाल, प्रताप जाधव, जसमुद्दीन पटेल अशी संशयितांची नांवे आहेत. त्यांच्याकडून ८ लाख ५६ हजार ५०५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत वडगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिंद्रा एक्स यु व्ही कारमध्ये बसून काही लोक क्रिकेट बेटींग घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरिक्षक राजेंद्र सानप यांच्या पथकाला संबंधीत गाडी वडगांव ते लाटवडे रोडवर असल्याची माहिती मिळताच मिळाली. पथकाने या ठिकाणी जावून छापा टाकला. यावेळी गाडीमध्ये हे चौघे जण बेटिंग करत होते.