कोल्हापूर - राज्यासह जिल्हाभरात विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सकाळपासून सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात पावसाचे वातावरण आहे. मात्र, तरी लोक घराबाहेर पडून मतदानाचा अधिकार बजावत असताना पाहायला मिळत आहे. दुपारनंतर मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने रविवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मतदान दुपारपर्यंत जास्तीत जास्त मतदान करावे, अशा सूचना सुद्धा दिल्या आहेत. त्यानुसार सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदान केंद्रावर मतदार मोठ्या संख्येने येत असताना पाहायला मिळत आहे.
हेही वाचा - भाजपचा 'हा' आमदार म्हणतो... 'ईव्हीएममध्ये कोणतेही बटण दाबले तरी मतदान भाजपालाच'
केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने जिल्ह्यात त्याचा फायदा पुरेपुर फायदा घेतानाचे चित्र आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील अनेक लोकांना भाजपने आपल्यात सामावून घेतले आहे.
मागील निवडणूकीत काँग्रेसने 9 जागांवर उमेदवार दिले होते. मात्र, त्यात ते अपयशी ठरले होते. तर राष्ट्रवादी पक्षाने 2 जागा राखल्या होत्या. आता दोन्ही पक्षांची आघाडी आहे. तर त्यातही ताकदीचे उमेदवार नसल्याचे चित्र आहे. तसेच आघाडीला वंचितचा देखील धोका आहे. तर आता उमेदवार कोणाच्या पदरात मते टाकतात हे येत्या 24 तारखेला स्पष्ट होणार आहे.