कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदी विश्वास नारायण पाटील यांची निवड झाली. गोकुळ शिरगाव येथील गोकुळ प्रकल्प येथे संचालक मंडळाच्या बैठकीत नूतन अध्यक्षपदी पाटील यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले. पाटील हे तीन दशकाहून अधिक काळ संचालक म्हणून गोकुळशी निगडीत आहेत. सत्ताधारी गटातून दोन वेळा अध्यक्षपद भूषवले. मात्र आता झालेल्या निवडणुकीत विरोधी गटात दाखल होऊन गोकुळ दूध संघात तिसऱ्यांदा त्यांनी अध्यक्षपद मिळवले.
गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यानंतर नवीन अध्यक्ष कोण असणार ? याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या. निवडणुकीच्या अगोदर तत्कालीन सत्ताधारी आघाडीला सोडून माजी चेअरमन विश्वास पाटील व अरुण डोंगळे यांनी विरोधी आघाडीशी दोस्ताना केला. करवीर आणि राधानगरी तालुक्यातील ठराव मोठया संख्येने या दोघाकडे आहेत. शिवाय ३० वर्षाहून अधिक काळ गोकुळमध्ये कार्यरत असल्याने दूध उत्पादक शेतकरी, ठराव धारकांशी जिव्हाळयाचे नाते आहे. या दोघांनी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीत सहभागी झाल्यामुळे सत्ता परिवर्तनाच्या लढाईला बळ मिळाले. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने २१ पैकी १७ जागा जिंकत गोकुळवर सत्ता मिळवली.
निवडणुकीनंतर अध्यक्षपदी कोण ? विश्वास पाटील की अरुण डोंगळे हीच चर्चा होती. पहिल्यांदा संधी कोणाला मिळणार याकडेही अनेकांच्या नजरा होत्या. निकालानंतर या दोघांच्याच नावांनी अध्यक्षपदाच्या निवडीची चर्चा रंगली होती. विद्यमान संचालक डोंगळे आणि पाटील हे सिनीअर आहेत. यापूर्वी अध्यक्षपदी काम केल्यामुळे प्रशासकीय कामकाजाचा अनुभव आहे.
पालकमंत्री पाटील व ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांनी गुरुवारी, (१३ मे) सत्तारुढ आघाडीच्या संचालकांची बैठक घेतली. दोन तासाहून अधिक वेळ खलबते होऊनही अध्यक्षपदाचा तिढा सुटला नव्हता. दोन्ही नेत्यांनी शुक्रवारी सकाळी यासंबंधी निर्णय घेण्याचे ठरविले. या दोन्ही नेत्यांनी चर्चा करुन बंद पाकिटातून अध्यक्षपदाचे नाव पाठविले.
दरम्यान दुपारी एक वाजता गोकुळ शिरगाव येथील गोकुळ प्रकल्प येथील कार्यालयात अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया पार पडली. याप्रसंगी संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, माजी आमदार सुजित मिणचेकर, शशिकांत पाटील-चुयेकर, अमरसिंह पाटील, अजित नरके, एस. आर. पाटील, नाविद मुश्रीफ, कर्णसिंह गायकवाड, रणजित पाटील, बाबासाहेब चौगले, प्रा. किसन चौगुले, बयाजी शेळके, प्रकाश पाटील, अंजना रेडेकर, अभिजीत तायशेटे, नंदकुमार ढेंगे यांच्या उपस्थितीत अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया पार पडली.
विश्वास पाटील यांच्या गळ्यात गोकुळ अध्यक्षपदाची तिसऱ्यांदा माळ - गोकुळ निवडणूक
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदी विश्वास नारायण पाटील यांची निवड झाली. गोकुळ शिरगाव येथील गोकुळ प्रकल्प येथे संचालक मंडळाच्या बैठकीत नूतन अध्यक्षपदी पाटील यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले.