कोल्हापूर - समरजीतसिंह घाटगे यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी त्यांच्या आईला धमकी मिळाली. याबाबत, कागलमध्ये इतक्या खालच्या पातळीचे राजकारण सुरू आहे, याचे दुःख होत असल्याची प्रतिक्रिया समरजितसिंह यांनी व्यक्त केली.
समरजीतसिंह कागल विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आहेत. त्यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी यासाठी त्यांच्या आई सुहासिनीदेवी घाटगे यांना पाच वेळा फोन करून धमकी देण्यात आली. समरजितराजे यांच्या पत्नी संयोगीता घाटगे यांनी देखील या घटनेबद्दल तीव्र रोष व्यक्त केला आहे.
हेही वाचा - शिवसेना राममंदिराच्या मुद्द्यावर अजूनही ठाम'
शाहू महाराजांच्या जनक घराण्याचा बळी पाडण्याचा प्रयत्न होत आहे. यावरूनच कुठल्या पातळीपर्यंत हे राजकारण गेले आहे, याचा विचार करायला पाहिजे, असेही संयोगीता घाटगे या म्हटल्या. दरम्यान, याबाबत संबंधित अनोळखी व्यक्तिविरोधात पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.