ETV Bharat / state

कोल्हापुरात विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन, परीक्षांवर होणार परिणाम - Shivaji University Staff protest

लेखणी, अवजार बंद आंदोलनात परीक्षा विभागही सहभागी झाला आहे. आंदोलन बुधवारपर्यंत सुरू राहणार असल्याने त्याचा परिणाम अंतिम वर्षाच्या परीक्षांवरही होणार आहे.

विद्यापीठ कर्मचारी आंदोलन
विद्यापीठ कर्मचारी आंदोलन
author img

By

Published : Sep 26, 2020, 4:06 PM IST

Updated : Sep 26, 2020, 4:27 PM IST

कोल्हापूर- शिवाजी विद्यापीठ आणि जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी गुरुवारपासून (२४ सप्टेंबर) लेखणी, अवजार बंद आंदोलन सुरू केले आहे. ३० सप्टेंबरपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आणि आश्‍वासित प्रगती योजनेची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी, यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.

माहिती देताना महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे अतिरिक्त महासचिव आनंद खामकर

अंतिम वर्षाच्या आणि बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांच्या १ ऑक्टोबरपासून परीक्षा होणार आहेत. मात्र, लेखणी बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात शिवाजी विद्यापीठ कृती समिती अंतर्गत शिवाजी विद्यापीठ सेवक संघ, शिवाजी विद्यापीठ ऑफिसर फोरम, महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ या संघटना सहभागी झाल्या आहेत. गुरुवारला सकाळी १०.३० वाजता आंदोलनाला सुरवात झाली होती. पहिल्या दिवशी विद्यापीठातील मुख्य इमारतीमध्ये सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. दुसऱ्या दिवशी परीक्षा विभागासमोरही ठिय्या आंदोलन झाले. तर, आज तिसऱ्या दिवशी अतुल एतावडेकर, संजय कुबल आणि आनंद खामकर यांच्या नेतृत्वाखाली विविध कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयासमोर मूक निदर्शने केली.

शिष्टमंडळाने कूलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत आंदोलकांच्या मागण्या आणि शासनाची भूमिका याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी दिवसभर लेखणी, अवजार बंद आंदोलन केले. ३० सप्टेंबरपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार आहे. त्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे.

संघटनांच्या प्रमुख मागण्या-

- सेवांतर्गत आश्‍वासित प्रगती योजना पुनर्जीवित करून ती पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावी.

- अकृषी विद्यापीठीय शिक्षकेतर पदासाठी सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार सुधारित वेतन लागू करणे.

- तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखाली तंत्रशास्त्र विद्यापीठे, अशासकीय अनुदानित महाविद्यालये यांना ५ दिवसांचा आठवडा करणे.

- विद्यापीठे, महाविद्यालयातील रिक्त पदांची तत्काळ भरती करणे.

- शासकीय कर्मचाऱ्यांना सातव्या आयोगाच्या अनुषंगाने सेवे नंतरची ३ लभांची योजना लागू करावी.

लेखणी, अवजार बंद आंदोलनात परीक्षा विभागही सहभागी झाला आहे. आंदोलन बुधवारपर्यंत सुरू असणार असल्याने त्याचा परिणाम अंतिम वर्षाच्या परीक्षांवरही होणार आहे.

हेही वाचा- महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील तीन जणांवर 'कोविशिल्ड' लसीची चाचणी

Last Updated : Sep 26, 2020, 4:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.